धुळे : लॉकडाऊनमुळे लग्नाचा संपूर्ण हंगाम वाया गेल्याने शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी बग्गी आणि घोडा व्यावसायिकांनी केली आहे़धुळे शहर बग्गी आणि घोडापालन वेलफेअर असोसिएशनने गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले़निवेदनात म्हटले आहे की, बग्गी आणि घोडा यांचा व्यवसाय पूर्णपणे लग्न समारंभांवर अवलंबून आहे़ परंतु कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यात धुमधडाक्यात एकही लग्न झाले आहे़ साध्या पध्दतीने लग्न झाल्याने बग्गी आणि घोड्याला मागणी नव्हती़ व्यवसाय शंभर टक्के ठप्प होता़ तसेच हा व्यवसाय मुक्या प्राण्यांशी संबंधित आहे़ प्रतिघोडा चारशे रुपये खर्च आहे़ व्यवसाय बंद असल्याने घोड्यांसाठी खाद्य आणण्यासाठी हातात पैसा नाही़ त्यामुळे मुक्या प्राण्यांसह कुटूंबाची देखील उपासमार होत असल्याने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी अध्यक्ष सचिन गवळी, उपाध्यक्ष किरण अहिरे, सचिव मनोज पुकळे, खजिनदार नितीन चौधरी, छोटू पवार, जलील शेख, तुषार पाटील, राहूल चौधरी, नरेंद्र मोरे, मांगीलाल चौधरी आदींनी केली आहे़
शासनाने आर्थिक मदत द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 21:47 IST