लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : येथील एस़पी़डी़एम़ महाविद्यालयातील ४ छात्रसैनिक विद्यार्थ्यांची भारतीय सैन्यदलात निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी किसान विद्या प्रसारक संस्थेच्या कोषाध्यक्षा आशाताई रंधे, संस्थेचे विश्वस्त रोहित रंधे व प्राचार्य डॉ़एस़एऩपटेल यांच्या हस्ते शुभम धनगर, विजय भील, राकेश धनगर व हेमंत पाटील या ४ एऩसी़सीक़ॅडेटचा भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला़ त्यांनी मनोगतातून महाविद्यालय व संस्थेच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.याप्रसंगी आशाताई रंधे यांनी नवनियुक्त छात्रसैनिकांना देशसेवेची संधी प्राप्त झाल्याबद्दल कौतुक केले. तर इतर तरुणांनीही त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.प्राचार्य डॉ़पटेल यांनी महाविद्यालयाचा लौकिक वाढविल्याबद्दल या ४ छात्रसैनिकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी एनसीसी प्रमुख प्रा.परेश पाटील,माजी सैनिक राम पवार, उपप्राचार्य दिनेश पाटील, डॉ़एम़व्ही़ पाटील, प्रा़ए़ई़माळी तसेच प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सैन्यदलात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक व आप्तस्वकीयांनी कौतुक केले.
सैन्यदलात निवड झालेल्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 15:08 IST