शिवणयंत्र व्यवसायाला अत्यावश्यक सेवेचा दर्जा द्या; व्यावसायिकांची शासन-प्रशासनाकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:32 AM2021-04-14T04:32:51+5:302021-04-14T04:32:51+5:30

यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, कृषिमंत्री, पालकमंत्री, आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आदींना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, ...

Give the sewing machine business an essential service status; Demand of professionals for governance | शिवणयंत्र व्यवसायाला अत्यावश्यक सेवेचा दर्जा द्या; व्यावसायिकांची शासन-प्रशासनाकडे मागणी

शिवणयंत्र व्यवसायाला अत्यावश्यक सेवेचा दर्जा द्या; व्यावसायिकांची शासन-प्रशासनाकडे मागणी

Next

यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, कृषिमंत्री, पालकमंत्री, आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आदींना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, खाद्यपदार्थ, तेल, पशुखाद्य, दवाखाने, औषधालये आदी अत्यावश्यक वस्तूंच्या व्यवसायात शिवणयंत्राची भूमिका महत्त्वाची असते. कोरोनाशी लढण्याचे महत्त्वाचे हत्यार मास्क तयार करण्यासाठी शिवणयंत्राची आवश्यकता असते.

रुग्णालयातील चादर, रुग्णांचे कपडे, डाॅक्टरांचे कपडे, सर्जिकल गाऊन, स्क्रब तयार करण्यासाठी देखील शिवणयंत्र लागते. या वस्तूंचा वेळेवर आणि पुरेसा पुरवठा झाला नाही तर रुग्णालयांमध्ये असुविधा होऊ शकते. त्यामुळे शिवणयंत्राला अत्यावश्यक वस्तू आणि अत्यावश्यक व्यवसायाचा दर्जा द्यावा, अशी मागणी आहे. रबी हंगामाची पिके आता काढली जात आहेत तर काहींनी काढली आहेत. धान्य साठिवण्यासाठी गोण्यांचा वापर केला जातो. बॅग क्लोझर शिवणयंत्राच्या साहाय्याने गोण्या पॅक करून बाजारात विक्रीसाठी आणल्या जातात. तेल उत्पादक तसेच पशुखाद्य कंपन्यांना देखील शिवणयंत्रे पॅकिंगसाठी आवश्यक असतात.

या सर्व जीवनावश्यक वस्तूंचा तुडवडा होऊ नये, पुरवठा सुरक्षित आणि नियमित व्हावा यासाठी शिवण यंत्रांची विक्री आणि दुरुस्ती व्यवसायाला अत्यावश्यक सेवेचा दर्जा द्यावा, अशी मागणी शिवणयंत्र विक्रेते आणि दुरुस्ती कामगारांनी केली आहे.

Web Title: Give the sewing machine business an essential service status; Demand of professionals for governance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.