धुळे : कोरोना विषाणूचा संसर्ग अधिक व इतरत्र फैलू नये म्हणून शासनाने केलेल्या लॉकडाऊनमुळे गुरुवारी रात्री गावातील लक्ष्मीबाई जाधव (वय ८३) यांचे निधन झाले. कोरोनामुळे संपूर्ण महाराष्टÑात लॉकडाउन असल्यामुळे त्यांच्या पुणे आणि मालेगाव येथून येऊ न शकणाºया दोन्ही मुलींनी आपल्या आई चे अंतिम दर्शन व्हिडीओ कॉल द्वारे घेतले.सोनगीर येथे राहणाºया लक्ष्मीबाई तानाजी जाधव (वय ८३ वर्ष) यांच्या पश्चात तीन मुले, पाच मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पतीचे निधन २२ वर्षापूर्वी झाले होते. त्यानंतर सर्व मुली व मुलांचा सांभाळ केला आणि त्यांची लग्न सुद्धा चांगल्या ठिकाणी करुन दिले. मुलींपैकी सुनंदा हिचे मालेगावला तर गायत्रीचे पुणे या ठिकाणी लग्न केले.सुनंदा व गायत्री गुरुवारी रात्री आपल्या घरी घरकाम करीत असतांना दोघ भावांनी फोन केला व आईचे निधन झाल्याची दु:खद बातमी दिली. याप्रसंगी दोघ मुलींनी फोन वरच हंबरडा फोडला. आई चे निधन झाल्याचे समजताच दोघी बहिणी आपल्याला आईच्या अंतिम दर्शनाला कसकाय जायचे या बाबत विचारत पडल्या. लॉकडाउनमध्ये पुणे व मालेगाव हे दोन्ही शहरे रेडझोनमध्ये असल्याने सोनगीरला येणे अशक्य होते. त्यामुळे त्यांच्यासुरेश व राजेंद्र या दोघी भावांनी बंधू सुरेश जाधव व राजेंद्र जाधव या बहिणीना सर्वत्र बंद असतांना सोनगीरला येणे शक्य नसल्याचे सांगितले. शेवटी यावर पर्याय म्हणून दोघी भावानी व्हिडीओ कॉलींग करुन मोबाईलद्वारे बहिणींना आईचे दर्शन करवून दिले. यावेळी मयत लक्ष्मीबाईचे जावाई आणि नातवंडे हे सुद्धा उपस्थित होते. त्यांनीही मोबाईलवरुन आपल्या सासु व आजीचे दर्शन घेतले. हे दृष्य मन हेलावून देणारे होते.गुरुवारी लक्ष्मीबाई यांच्या पार्थिवावर निवडक लोकांच्या उपस्थितीत रात्रीच अंतिमसंस्कार करण्यात आले.
पुणे व मुंबई येथे राहणाऱ्या मुलींनी घेतले मोबाईलद्वारे ‘आई’चे अंतिमदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 18:09 IST