शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात नराधम बापाविरुध्द मुलीने नोंदविली फिर्याद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 16:48 IST

शांतीनगरातील घटना : अवघ्या पाऊण तासात नराधम गजाआड

ठळक मुद्देबुधवारी सायंकाळी गुन्हा नोंदविण्यात आलापोलिसांनी तपासाची चक्रे फिरविलीनराधम भालचंद्र बोरसे याला अवघ्या पाऊण तासात अटक केली 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : स्वत:च्या पोटच्या मुलीवर बापाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शहरातील शांतीनगरात मंगळवारी दुपारी घडली़ याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने आझादनगर पोलीस स्टेशनला धाव घेतल्यानंतर ही बाब उजेडात आली़ गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित भालचंद्र भगवान बोरसे (४५, शांतीनगर, अभय कॉलेजजवळ, धुळे) या नराधम बापाला पोलिसांनी गजाआड केले़ शहरातील अभय कॉलेजजवळ असलेल्या शांती नगरात भालचंद्र बोरसे हे आपल्या परिवारासोबत प्लॉट नंबर ४ मध्ये वास्तव्यास आहे़ त्यांची पत्नी कुठे बाहेर गेलेली असताना त्यांची १७ वर्षाची अल्पवयीन मुलगी घरी एकटीच होती़ मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास तिच्या एकटेपणाचा फायदा कुण्या दुसºयाने न उचलता तिच्या बापानेच उचलला़ बळजबरीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि ही बाब कोणालाही सांगितली तर तुझ्या आईला जिवे ठार मारुन टाकण्यात येईल़ अशी धमकी दिल्यामुळे ही मुलगी भेदरली़ थोड्यावेळाने तिची आई घरी आल्यानंतर पीडित मुलीने आपबिती सांगत वडीलांनी केलेला पराक्रम सांगितला़ याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलगी, तिची आई आणि मामा हे आझादनगर पोलीस स्टेशनला आले़ पीडिताने तिच्या बापाविरोधात बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता फिर्याद नोंदविली़ त्यानुसार नराधम भालचंद्र भगवान बोरसे याच्या विरोधात भादंवि कलम ३७६ (२), (फ) सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण, अधिनियम २०१२ चे कलम ६ प्रमाणे आझादनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एच़ एऩ उगले करीत आहेत़ 

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस