धुळे : शिरपूर येथील कोरोनाबाधीत महिलेचा धुळ्यात मृत्यू झाल्यानंतर कोणीही पुढे येण्यास तयार नसताना मनपाचे नगरसेवक अमीन पटेल आणि त्यांच्या गृपने जातीय सलोखाचे दर्शन घडविले़ मंगळवारी दुपारी हिरे मेडीकलच्या मागील बाजूस त्या महिलेवर अंत्यसंस्कारही केले़शिरपूर येथील महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला़ परिणामी त्या महिलेच्या घरातील सदस्य यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली़ त्यामुळे त्या सर्व सदस्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले़ परिणामी त्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांसह कोणीही पुढे आले नाही़ अंत्यसंस्कार कोण करेल? ही बाब अमीन पटेल व त्यांच्या गृपला कळताच त्यांनी पुढाकार घेतला़ डॉक्टरांनी देखील संम्मती दर्शविली़ त्यामुळे पटेल यांच्यासह अबू अन्सारी, सलमान अन्सारी, डॉ़ अश्पाक अन्सारी, डॉ़ सिद्दीकी, अबीद अन्सारी, सलीम अन्सारी, प्रा़ शोएब काझी, नासीर मलिक यांचे अंत्यसंस्कारावेळी सहकार्य लाभले़
कोरोनाबाधीत महिलेवर धुळ्यात अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 22:11 IST