शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

निधी मंजूर, पण कामे कोण करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 9:36 PM

भूमिगत वीज वाहिन्यांसाठी ३८ कोटींना मंजूरी : आमदार-मनपामध्ये होणार संघर्ष?

ठळक मुद्देआमदार व महापौर यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शहरातील भुमिगत वीज वाहिन्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी ३८ कोटी रूपयांचा निधी मंजूर केल्याची घोषणा केली़ पण ते म्हणाले, सदर निधीचा विनियोग कसा करायचा याबाबत आमदार, महापौर व नगरसत्यामुळे आता निधी मंजूर असला तरी कामे करणार कोण? हा प्रश्न उपस्थित झाला असून या निधीवरूनही महापालिका व आमदार गोटेंमध्ये थेट संघर्ष होण्याची चिन्हे आहेत़ शहरातील वीज तारांचा प्रश्न गंभीर असून तो सुटणे आवश्यक आहेच,पण असा पेचप्रसंग निर्माण झाल्यावर त्यात सरशी कोणाची होणार, हा देखील महत्त्वाचा प्रश्न असून त्यावर पुढील वर्षी होणाºया निवडणूकीचे गणित अवलंबून असणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील धोकादायक वीज वाहिन्या भुमिगत करण्यासह अनुषंगिक कामांसाठी ३८ कोटी रूपयांचा निधी मंजूर केल्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धुळयात केली़ मात्र आमदार व महापालिकेत त्यावरून पुन्हा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता असल्याने निधी मंजूर होऊनही कामे करणार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे़शहरात एका वीज उपकेंद्रासाठी मनपाने जागा दिली असून या जागेची किंमत ६६ लाख ६६ हजार इतकी आहे़ ऊर्जामंत्र्यांनी गेल्यावर्षी दिलेल्या आदेशानुसार तितक्या किंमतीचे कामे महावितरण मनपाला करून देणार होते़ त्यामुळे महावितरणने कामे सुचविण्याची मागणी मनपाकडे केली़ त्यानुसार महापालिकेने सुकवद व बाभळे येथील वीज उपकेंद्रांची क्षमता वाढविणे आणि शहरातील आग्रा रोडवरील वीजतारा भुमिगत करण्याचा प्रस्ताव दिला होता़ त्याबाबत मनपा व महावितरणमध्ये पत्रव्यवहारही गेल्या वर्षापासून सुरू आहे़ त्यानुसार महापौर कल्पना महाले यांनी ऊर्जामंत्र्यांनी नुकत्याच घेतलेल्या जनता दरबाराच्या कार्यक्रमातही आग्रारोडवरील भुमिगत तारांचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली़  दुसरीकडे आमदार अनिल गोटे यांनी संपूर्ण शहरातील वीजवाहिन्या भुमिगत करणे आवश्यक असून वीज वाहिन्या, खांब, डीपींमुळे आधीच अतिक्रमणयुक्त असलेल्या रस्त्यांवर वाहतुकीचा खोळंबा होतो़ शिवाय सातत्याने अपघात होत असल्याची भुमिका घेतली़ तसेच गेल्या वर्षी २़५ कोटी रूपयांच्या निधीची मागणी केल्याचेही सांगितले़ शहरात वीज उपकेंद्रांसाठी जागा मिळवून दिल्याची स्पष्टोक्ती आमदार गोटे यांनी केली़.

महापौरांनी आग्रारोडवरील वीजतारा भुमिगत करण्याची मागणी केली होती़ आपण संपूर्ण शहराच्या वीजतारांची समस्या मांडली असून संबंधित कामासाठीचा निधी महावितरणला मिळेल़ मनपाचा संबंध नसून महावितरण हे काम मार्गी लावेल़- अनिल गोटे, आमदार, धुळे

ऊर्जामंत्र्यांनी मनपाच्या पाठपुराव्याला प्रतिसाद देत महावितरणला महापौर व मनपा पदाधिकाºयांशी चर्चा करून डीपीआर तयार करण्याचे आदेश दिले आहेत़ त्यासंदर्भात लवकरच बैठक घेणार आहे़ बाकी कुणीही याप्रश्नी पाठपुरावा केलेला नाही़- कल्पना महाले, महापौर, मनपा, धुळे