आमदार काशिराम पावरा यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन त्याबाबत बैठकदेखील घेतली. यावेळी प्रांताधिकारी डॉ. विक्रमसिंह बांदल, तहसीलदार आबा महाजन, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष राजगोपाल भंडारी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. ध्रुवराज वाघ यांनी ऑक्सिजन प्लांटबाबत सविस्तर चर्चादेखील केली. एसव्हीकेएम संस्थेचे अभियंता ईश्वर पाटील यांनी तांत्रिक माहिती दिली. यावेळी भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी, भाजपा माजी जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, इतर डॉक्टर उपस्थित होते.
वैद्यकीय अधिक्षक डॉ. ध्रुवराज वाघ यांच्या दालनात बैठक झाल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात कोणत्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येईल. याबाबत आमदार काशिराम पावरा यांनी जागेची पाहणी केली. आमदार निधीतून उपजिल्हा रुग्णालयातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन ऑक्सिजन प्लांटसाठी ४५ लाख रुपये निधी दिला. त्याबाबतचे पत्र आमदार पावरा यांनी गेल्या चार दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी संजय यादव यांना दिले आहे़