फरार भैय्या गुजेलाच्या मुंबईतील पवईतून मुसक्या आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 01:40 PM2020-10-24T13:40:53+5:302020-10-24T13:41:41+5:30

माऊली मल्टिस्टेट सोसायटी : १० कोटी २९ लाख ४१ हजाराचे फसवणूक प्रकरण

The fugitive brother smiled at Guzella's Powai in Mumbai | फरार भैय्या गुजेलाच्या मुंबईतील पवईतून मुसक्या आवळल्या

dhulle

Next

धुळे : माऊली मल्टिेस्टेट सोसायटी स्थापन करुन त्यात गुंतवणूक केल्यास ठेवीदारांना आकर्षक व्याजदर, वेगवेगळे बक्षिस, प्रेक्षणीय ठिकाणी सहल असे आमिष दाखवून १ हजार ४६१ ठेवीदारांची १० कोटी २९ लाख ४१ हजार ९५६ रुपयांची फसवणूक प्रकरणातील संशयित असलेला भैय्यासाहेब यशवंत गुजेला (रा़ धुळे) हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता़ त्याचा शोध सुरु असतानाच मुंबईतील पवई येथून शुक्रवारी सायंकाळी उशिरा त्याला पकडण्यात आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक तथा तपासाधिकारी हेमंत बेंडाळे व त्यांच्या पथकाला यश आले़ त्याला शनिवारी सकाळी धुळ्यात आणण्यात आले़़ याप्रकरणातील विष्णू रामचंद्र भागवत याला यापुर्वीच पकडण्यात आले असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे़ दोन संशयित फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत़ २०१५ ते २०१९ या कालावधीत फसवणुकीचा हा प्रकार घडला़ किशोर चिंधू पाटील यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर फसवणुकीचा हा प्रकार चव्हाट्यावर आला होता़ धुळे तालुका पोलीस ठाण्यातून हे प्रकरण अधिक चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे़ सहायक पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे घटनेचा तपास करीत आहेत़

Web Title: The fugitive brother smiled at Guzella's Powai in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे