विद्यार्थ्यांनी विकसित केले चार सॉफ्टवेअर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:24 AM2021-06-11T04:24:52+5:302021-06-11T04:24:52+5:30

महाविद्यालयाचे विद्यार्थी पुष्कर आसापुरे, सर्वेश चौधरी, दीपश्री देशमुख, धनश्री रणदिवे यांनी ॲानलाइन शिक्षण प्रणालीत प्रोक्टर सिस्टिम व मशीन ...

Four software developed by the students | विद्यार्थ्यांनी विकसित केले चार सॉफ्टवेअर

विद्यार्थ्यांनी विकसित केले चार सॉफ्टवेअर

Next

महाविद्यालयाचे विद्यार्थी पुष्कर आसापुरे, सर्वेश चौधरी, दीपश्री देशमुख, धनश्री रणदिवे यांनी ॲानलाइन शिक्षण प्रणालीत प्रोक्टर सिस्टिम व मशीन लर्निंगचा उपयोग करून कॉपी विरहित परीक्षा घेण्याचे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. तसेच रुचिकेत चकोर, सुश्मिता चौधरी, पल्लवी ब्राह्मणकर, जस्विनी जाधव या विद्यार्थ्यांनी ई लर्निंगमध्ये विविध विषयांवर आधारित फ्री, प्रिपेड, पोस्ट पेड कोर्सेसचे विद्यार्थी व शिक्षकांना उपयुक्त होईल, असे सॉफ्टवेअर विकसित केले. नीलेश दुसाने, ईश्वर गिरासे, विशाखा भट्टड, ललित पाटील या विद्यार्थ्यांनी साईन लँग्वेज व फेस रीडिंगचा उपयोग करून मूकबधिर विद्यार्थ्यांच्या सोईसाठी कंटेटमधून टेक्स्ट निर्मितीचे ८४ टक्के अचूक असणारे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. तर अलिफा जरीफ, सायली शिंदे, देवयानी सोनवणे या विद्यार्थिनींनी प्रा. इंद्रभान बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम डेटा ॲनालिसिसचा रेट डिटेक्शन सॉफ्टवेअर विकसित केले आहे. या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे अध्यक्ष सुभाष देवरे, यांनी कौतुक केले आहे.या विद्यार्थ्यांचा प्राचार्य डॉ. हितेंद्र पाटील यांच्या हस्तेसन्मान करण्यात आला या प्रसंगी जेष्ठ प्राध्यापक डॉ. ई. आर. देवरे, प्रकल्प मार्गदर्शक प्रा. भालचंद्र मांडरे, प्रा. इंद्रभान बोरसे, आनंद कुलकर्णी उपस्थित होते.

Web Title: Four software developed by the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.