शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यानजिक तिहेरी अपघातात चौघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 18:06 IST

विचित्र घटना : ट्रक, टेम्पो व रिक्षा लळींग घाटात एकमेकांना धडकले

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : भरधाव वेगाने धुळ्याच्या दिशेने येणाºया ट्रकने रस्ता ओलांडून समोरुन मालेगावकडे जाणाºया टेम्पोला जोरदार धडक दिली़ या अपघातात टेम्पोचा चुराडा झाला आहे़ टेम्पोच्या मागे असणाºया रिक्षाचा पुढचा भाग दाबला गेला़ या तिहेरी अपघातात तिघे जागीच ठार तर एकाचा रूग्णालयात नेताना मृत्यू झाला़ अन्य तिघे जखमी झाले आहेत़ अपघाताची ही घटना मुंबई -आग्रा महामार्गावरील लळींग घाटात बुधवारी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास घडली़ एमएच १८ बीए २१९२ क्रमांकाचा ट्रक हा शिर्डी येथून मालेगावकडून धुळ्याकडे भरधाव वेगाने येत होता़ मुंबई आग्रा महामार्गावरील लळींग घाटात उतरती आणि वेगात असल्याने ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक हा विरुध्द दिशेने वळला़ त्याचवेळेस एमएच १७ बीडी ५२६९ क्रमांकाचा गोदावरी कंपनीचे दूध घेऊन जाणारा टेम्पो धुळ्याकडून मालेगावच्या दिशेने जात होता़ या टेम्पोला ट्रकने जोरदार धडक दिली़ धडक एवढी जोरात होती की टेम्पोच्या बाजूचा भाग अक्षरश: कापला जावून टेम्पोचे दोन तुकडे झाले़ तर टेम्पोच्या मागे असलेली एमएच १८ डब्ल्यू ५६२९ क्रमांकाच्या रिक्षेचाही चुराडा झाला होता़ टेम्पोला धडक दिल्यानंतर ट्रक हा घाटातील दरीत कोसळला़ ट्रकच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला होता़ अपघाताची ही घटना बुधवारी दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास घडली़ या अपघातातातील मृतांमध्ये  अहमद अली साहेब अली (५०, रा़ मालेगाव), त्यांची पत्नी नौशाद बी अहमद अली (४५, रा़ मालेगाव) आणि त्यांची नात आलिया जाकीर अली (६) आणि अहमदाबाद येथील खॉजान यांचा समावेश आहे़ तर जखमींमध्ये ट्रकचालक सोकतखान करीमखान पठाण (२९, रा़ साक्री) विक्की नंदलाल ठाकरे (२५, रा़ सबगव्हाण, ता़ पारोळा, जि़ जळगाव) आणि अतुल चैत्राम पाटील (२०, रा़ दळवेल, ता़ पारोळा जि़ जळगाव) यांचा समावेश आहे़ अहमदअली आणि त्यांचा परिवार हा सुरत येथे काही कार्यक्रमासाठी गेले होते़ परत मालेगाव येथे येण्यासाठी ते रेल्वेने अमळनेरपर्यंत आले़ तेथून धुळ्यात आल्यानंतर ते टेम्पोतून मालेगावकडे जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला़ अपघाताची माहिती मिळताच मोहाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले़ अपघातातील जखमी आणि मृतांना तातडीने रुग्णवाहिकेने हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात दाखल केले़ 

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात