माजी शिक्षक आमदार जे़ यू़ ठाकरे यांचे कोरोनामुळे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 12:26 PM2020-07-28T12:26:38+5:302020-07-28T12:35:16+5:30

नाशिकला सुरु होते उपचार : साक्री तालुक्यात हळहळ

Former teacher MLA JU Thackeray dies due to corona | माजी शिक्षक आमदार जे़ यू़ ठाकरे यांचे कोरोनामुळे निधन

माजी शिक्षक आमदार जे़ यू़ ठाकरे यांचे कोरोनामुळे निधन

Next

धुळे : माजी शिक्षक आमदार जयवंतराव उत्तमराव अर्थात जे़ यू़ ठाकरे (७४) यांचे मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास नाशिक येथील खासगी रुग्णालयात कोरोनामुळे निधन झाले़ ठाकरे हे गेल्या महिन्याभरापासून आजारी होते़ प्रकृति सुधारत नसल्यामुळे त्यांना नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ त्यांना कोरोना झाला होता़ ठाकरे हे नाना या टोपण नावाने सुपरिचित होते़ नाशिक विभागीय शिक्षक आमदार म्हणून १९९६ ते २००२ पर्यंत विधान परिषदेचे सदस्य होते़ त्यांच्या निधनामुळे साक्री तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे़ त्यांना अजित आणि रणजित नावाची दोन मुले आहेत़ नाशिक येथेच त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत़ 

Web Title: Former teacher MLA JU Thackeray dies due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे