लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यातील बेटावद, कापडणे, शिंदखेडा आणि खेडे येथील शैक्षणिक संस्थेत आरक्षित असलेल्या जागेवर खुला व संवर्गाच्या नियुक्त्या केल्याचा आरोप असलेले धुळ्याचे माजी शिक्षणाधिकारी भगवान सुर्यवंशी यांच्यावर होता़ याप्रकरणी त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा शहर पोलीस स्टेशनला दाखल होता़ शुक्रवार २८ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास सुर्यवंशी हे स्वत:हून पोलिसांना शरण आले़ त्यांना अटक केली असता न्यायालयात हजर करण्यात आले होते़ त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती़ त्याची मुदत शनिवारी संपली़ त्यांना पुन्हा दुपारुन न्यायालयात हजर करण्यात येणार आहे़ याप्रकरणाचा तपास शहर पोलीस निरीक्षक गणेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नाना आखाडे करीत आहेत़
धुळ्यातील माजी शिक्षणाधिकाºयाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 12:53 IST
फसवणूक : शिक्षण क्षेत्रात खळबळ
धुळ्यातील माजी शिक्षणाधिकाºयाला अटक
ठळक मुद्देमाजी शिक्षणाधिकारी यांना अटकशिक्षण क्षेत्रात खळबळ