शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
4
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
5
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
6
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
7
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
8
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
9
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
10
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
11
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
12
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
13
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
14
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
15
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
16
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
17
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
18
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
19
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
Daily Top 2Weekly Top 5

आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी काढली उणीदुणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 20:58 IST

प्रचार सभांमुळे वातावरण तापले :  एकहाती सत्ता दिल्यास विकास कामे करणार; नागरिकांच्या आशा पल्लवित 

ठळक मुद्देशिंदखेडा शहराचा सर्वात मुख्य पाणी प्रश्नासाठी मंजूर झालेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम ताताडीने मार्गी लावणार. स्टेशनरोडवरील भाजीविक्रेते बांधवांसाठी भाजी मंडई उभारणार, नगरपंचायतीची स्वतंत्र व अत्याधुनिक प्रशस्त इमारत तयार करणार.पाणी पुरवठा योजनेमुळे शहरात शुद्ध पिण्याचे पाणी मिळण्यासाठी फिल्टर प्लॅँट उभारणार.भगवा चौफुली ते एन. डी. मराठे शाळेपर्यंत प्रशस्त रस्ता व दुतर्फा झाडे, एलईडी लाईट बसविणार.

मनीष चंद्रात्रे । लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा :  शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीनिमित्ताने शुक्रवारी शिंदखेड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रचार सभा झाल्या. या सभांमध्ये त्यांनी एकमेकांच्या सरकारची उणीदुणी काढली. तसेच  एकमेकांच्या सरकारवर आरोपांच्या फैरी झाडत या निवडणुकीत एकहाती सत्ता दिल्यास शिंदखेडा शहराचा चेहरामोहरा बदलवून दाखवू असे त्यांनी येथील नागरिकांना आश्वासित केले. त्यामुळे नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दरम्यान, शुक्रवारी झालेल्या प्रचारसभांमुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीच्या रिंगणात कॉँग्रेस पक्षाने १५ नगरसेवक पदाच्या उमेदवारांसह १ नगराध्यक्ष पदासाठीचा उमेदवार उतरविले आहे. तर दोन जागा राष्टÑवादी कॉँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना दिल्या असून या निवडणुकीत कॉँग्रेस-राष्टÑवादी कॉँग्रेस पार्टी एकत्र निवडणूक लढवत आहे. तर दुसरीकडे भाजपाने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह १७ जागांवर त्यांचे उमेदवार दिले आहेत.शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत  भाजपा-कॉँग्रेसमध्ये काट्याची लढत होणार असली तरी  या दोन्ही मोठ्या पक्षांना शिवसेना, समाजवादी पार्टी, बसपा, मनसे व अपक्ष उमेदवारांनीही तगडे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे विजयश्री खेचून आणण्यासाठी कॉँग्रेस व भाजपाच्या पदाधिकारी दिवस-रात्र एक करून उमेदवारांचा प्रचार करताना दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कॉँग्रेस व भाजपाच्या दोन दिग्गज नेत्यांच्या सभा शुक्रवारी शिंदखेड्यात पार पडल्या. सर्वसामान्य जनता, शेतकरी, व्यापारी त्रस्तशहरातील गांधी चौकात कॉँग्रेसची प्रचार सभा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात झाली. त्यांनी या सभेत भाजपा सरकारवर निशाणा साधला. गेल्या तीन वर्षात भाजपा सरकार सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे. सरकारच्या धोरणामुळे आज सर्वसामान्य जनता, शेतकरी व व्यापारी कमालीचे त्रस्त आहेत. विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य व शेतकºयांना होण्यासाठी सरकारतर्फे आॅनलाइनचा  घाट घातला जातो आहे. मात्र, ही आॅनलाइन प्रणाली अनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सत्तेवर येण्यापूर्वी रोजगार उपलब्ध करून देऊ, असे सरकारने म्हटले होते. मात्र, तसे झालेले नाही. महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. सरकारच्या या धोरणामुळे महाराष्टÑ राज्याची प्रगती होण्याऐवजी अधोगतीकडे वाटचाल होत असल्याचे त्यांनी सांगितले. विकास कामांपेक्षा स्वत:लाच केले मोठे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. गेल्या ७० वर्षांच्या कालावधित कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस पार्टीने सत्तेचा मोठा उपभोग घेतला. मात्र, त्यांनी विकास कामांपेक्षा पक्षातील कार्यकर्त्यांचा विकास करून त्यांना मोठे करण्यात धन्यता मानली. निवडणूक जवळ आली की गरीबी हटावचा नारा देत सत्ता मिळवून घ्यायची व त्यानंतर सत्तेचा स्वत:चा व्यक्तिगत स्वार्थासाठी उपयोग करून घ्यायचा. परिणामी, देशाचा व राज्याचा  विकास होऊ शकला नाही. शिक्षण, आरोग्य सुविधा, रोजगार, कृषी विषयक धोरण या सर्वच पातळीवर आघाडी सरकार अपयशी ठरले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र व राज्यात  सत्ता आल्यानंतर परिवर्तन घडवून दाखविले. ‘मी खाणार नाही, कोणाला खाऊ देणार नाही’, मी भ्रष्टाचार करणार नाही, कोणाला करू देणार नाही’, असे धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे. त्यादृष्टीने देशाची प्रगतीकडे वाटचाल सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथे म्हणाले.