शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

नियम तोडणाऱ्यावर पाच मिनिटांत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 23:11 IST

चलनव्दारे दंडात्मक कारवाई

ठळक मुद्देमद्यापींवर असेल लक्ष वाहनांचा स्पीड मर्यादास्पीडगनद्वारे रोडवर लेझरचा पॉइंट मोबाइलवर पाच मिनिटांमध्येच ई-चलनाच्या कारवाईचा संदेश तळीरामांना चांगलाच चाप बसणार

चंद्रकांत सोनार।धुळे : महामार्गावर होणाºया अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी धुळ्यातील महामार्ग वाहतूक पोलिसांना स्पीडगन कॅमेºयासह सुसज्ज इंटरसेप्टर व्हेइकल अत्याधुनिक वाहन देण्यात आले आहे़ या वाहनाव्दारे गेल्या तीन दिवसांत चार चालकांवर अवग्या पाच मिनिटांत ई-चलनव्दारे दंडात्मक कारवाई केली आहे़पाच वाहनांचा समावेशमहाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत महा मार्गावर होणाºया अपघाताच्या नियंत्रणासाठी महामार्ग पोलिसांना स्पीडगन लेझर तंत्रज्ञानावर आधारित इंटरसेप्टर व्हेइकल वाहन देण्यात आले आहे़ त्यात उत्तर महाराष्ट्रात धुळे, चाळीसगाव, पाळधी, शिरपूर तसेच विसरवाडी अशा पाच ठिकाणी अत्याधुनिक वाहन देण्यात आले आहे़कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणनाशिक येथेील कार्यक्रमात महामार्ग पोलिसांना इंटरसेप्टर व्हेइकल वाहन शनिवारी सोपविण्यात आले़ त्यासाठी धुळे महामार्ग वाहतूक पोलीस शाखेतील ३० ते ३५ अधिकारी व कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले आहे़ पूर्वी रस्त्याच्या कडेला थांबून, स्पीडगनद्वारे कारवाई करणारे वाहतूक पोलीस चार दिवसापासून आग्रा-मुंबई महामार्गावर नव्या वाहनात स्पीडगन ठेवून कारवाई करीत आहे़ त्यामुळे आता वाहन चालकांवर आता यंत्राची नजर राहणार आहे़पाच मिनिटात झाला दंडअत्याधूनिक वाहनाव्दारे आग्रा-मुंबई महामार्गावर नाशिकच्या दिशेने जाणाºया वाहनांचा वेग मयादेपेक्षा जास्त आढळून आला़ व्हेइकल कॅमेºयाव्दारे स्पीट जास्त असल्याने महामार्ग वाहतूक नियम तोडणाºया चार वाहनाच्या क्रमांकानुसार पाच मिनिटात थेट ई-चलनव्दारे दंडात्मक कारवाई करण्यात आली़या ठिकाणी असेल वॉचमहामार्ग पोलीस आग्रा-मुंबई महामार्गावरील सरवड फाटा, औरगाबाद चौफुली, रोकडोबा, आर्वी, लळीग किल्ला, पारोळा चौफुलीसह अन्य ठिकाणीव्हॅन सकाळी ते सायकाळ पर्यत महामार्गावर नियम तोडणाºया दुचाकी, चारचाकीसह अन्य वाहनांवर लक्ष देत आहे़असा होईल इंटरसेप्टर व्हेइकलचा फायदाया वाहनांमध्ये ब्रिथ अ‍ॅनालायझरची यंत्रणाही बसविलेली असून एखाद्या मद्यपी वाहनचालकाला थांबवून फोटोसह त्याने किती प्रमाणात मद्य प्राशन केले, याचा अहवालही तत्काळ मिळणार आहे. त्यामुळे तळीरामांना चांगलाच चाप बसणार आहे. वाहतुकीचे नियम तोडून वाहन चालविणाºयांवर कारवाई करणे, त्यांना पुराव्यासह ओळखणेही सुलभ होणार असून वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित होण्यास मोठी मदत होणार आहे.मद्यापींवर असेल लक्षमुंबई-आग्रा महामार्गावर महामार्ग पोलीसांनी केलेल्या कारवाई काही वाहनांचा स्पीड मर्यादा तर काही वाहनांचे ७५ मायक्रॉनपेक्षा कमी काळी फिल्म वाहनांच्या काचाना बंदी असतांना लावलेल्या आढळून आले़या चालकांवर होईल कारवाईमहामार्ग पोलीसांना दिलेल्या अत्याधुनिक वाहनांच्या स्पीडगनद्वारे रोडवर लेझरचा पॉइंट निघतो. त्याच पॉइंटच्या आधाराने वेगाने वाहन चालविणारे, सीटबेल्ट न लावणारे, मोबाइलवर बोलत वाहन चालविणाºयांना याद्वारे अचूक टिपले जाणार आहे. वाहन क्रमांकाच्या आधारे सर्व्हरद्वारे त्याची आरटीओकडे असलेल्या माहितीच्या आधारे वाहतुकीचे नियम तोडणाºया संबंधिताच्या मोबाइलवर पाच मिनिटांमध्येच ई-चलनाच्या कारवाईचा संदेश दिला जाणार आहे़

टॅग्स :Dhuleधुळे