शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

धुळ्यात अग्नितांडवात पाच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2017 03:47 IST

शनिवारी मध्यरात्रीनंतर शॉर्टसर्किटने घराला लागलेल्या आगीत येथील मारुती मंदिराचे पुजारी राम शर्मा यांच्या कुटुंबावर

धुळे : शनिवारी मध्यरात्रीनंतर शॉर्टसर्किटने घराला लागलेल्या आगीत येथील मारुती मंदिराचे पुजारी राम शर्मा यांच्या कुटुंबावर काळाने झडप घातली. दुर्घटनेत झोपेत असलेल्या शर्मा कुटुंबातील सर्व पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला. त्यात शर्मा, त्यांची वृद्ध आई, पत्नी व दोन मुलांचा समावेश आहे.शहरातील पाचकंदिल परिसरात धनादाळ नामक गल्लीत शनिवारी मध्यरात्री पावणेदोन वाजता राम शर्मा यांच्या घराला आग लागली. त्यात शोभाबाई छाजुलाल शर्मा (७०), राम छाजुलाल शर्मा (४०), जयश्री राम शर्मा (३५), राधे राम शर्मा (१२) व साई राम शर्मा (१०) यांचा दुर्दैवी अंत झाला. शर्मा यांच्या दुमजली घराला आग लागल्याचे मध्यरात्री काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ अग्निशमन विभागाला माहिती दिली. अग्निशमन दलाच्या बंबांनी अथक प्रयत्नांनी सुमारे तासाभराने आग नियंत्रणात आणली. मात्र तोपर्यंत शर्मा कुटुंबातील पाचही सदस्यांचा गुदमरुन मृत्यू झाला होता. राम शर्मा यांच्या पश्चात चार भाऊ व एक बहीण असा परिवार आहे़ रविवारी शर्मा कुटुंबीयांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी)