धुळे तालुका - तालुक्यात ६६ ग्रामपंचायतीसाठी १ लाख ५९ हजार ४१ पैकी १ लाख २२ हजार ७२६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. तालुक्यात सरासरी ७७.१७ टक्के मतदान झाले.
शिरपूर तालुका - तालुक्यात २८ ग्रामपंचायतींमध्ये एकूण ५२ हजार १५४ मतदारांपैकी ३९ हजार ८२३ जणांनी मतदानाचा हक्क बजाविला. तालुक्यात ७६.२६ टक्के मतदान झाले.
साक्री तालुका - तालुक्यात ४० ग्रामपंचायतीत मतदान झाले. त्यात ९१ हजार १९१ पैकी ७० हजार ४९० मतदारांनी मतदान केले. तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक ७७.६३ टक्के मतदान झाले.
शिंदखेडा तालुका - तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींतील ७७ हजार ४२७ पैकी ५९ हजार १०९ मतदारांनी मतदान केले. तालुक्यात ७६.३४ टक्के मतदान झाले.
जिल्ह्यात एकूण १८२ ग्रामपंचायतींमध्ये ३ लाख ७९ हजार ८१३ मतदारांपैकी २ लाख ९२ हजार १४८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. एकूण सरासरी ७७ टक्के मतदान झाले आहे.
सोमवारी मतमोजणी - जिल्ह्यात १८२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी चारही तहसील कार्यालय अथवा नियोजन केलेल्या मतमोजणी केंद्रावर सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात पहिला निकाल साडे दहा वाजता हाती येण्याची शक्यता आहे. सायंकाळी उशीरापर्यंत मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.