मागील मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाचा कहर सुरु झाला़ टप्पा टप्प्याने रुग्ण दाखल होत असताना त्या केअर सेंटरची देखील जबाबदारी आरोग्य यंत्रणेवर होती़ दाखल होणाºया रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळती घेत असतानाच दुसरीकडे त्याच कोविड केअर सेंटरचे देखील फायर आॅडीट करण्याचे काम हाती घेण्यात आले़ शहरासह जिल्ह्यात असलेल्या या केअर सेंटरचे फायर ऑडिट जवळपास पूर्णत्वास आले आहे़ कोणत्याही प्रकारचे संकट कोसळल्यास केअर सेंटर प्रशासन हिमतीने सामोरे जावू शकेल अशी स्थिती आहे़
धुळे शहरातील महापालिकेच्या अधिपत्याखाली असलेले प्रभात नगर मध्ये कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे़ ज्या वेळेस कोरोनाची लागण सुरु झाली होती त्यावेळेस या ठिकाणी गर्दी दिसून येत होती़ आता या ठिकाणी तसे फारसे कोणी नसलेतरी फायर ऑडिट मात्र झालेले आहे़
शिरपूर तालुक्यातील शिंगावे येथील मुलींच्या वसतीगृहात कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे़ २ इमारतीमध्ये सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे़ तात्पुरते असल्यामुळे आरोग्य विभागाने अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आले नव्हते़ परंतु आता लवकरच ती सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़
साक्री तालुक्यातील भाडणे येथे कोविड केअर सेंटर तालुकास्तरासाठी उभारण्यात आलेले आहे़ याठिकाणी दाखल होणाºया रुग्णांवर उपचार होत असतानाच इमारतीचे फायर ऑडिट देखील करण्यात आले आहे़ सध्याच्या स्थितीत कोणत्याही प्रकारची अडचणी दिसून येत नाही़ यदा कदाचित काही समस्या उदभवल्यास प्रशासन त्या हाताळू शकतात़
मागील वर्षापासून कोरोनाचा कहर सुरु झाला़ रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे तातडीने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली़ आवश्यक त्या ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारण्यात आले़ त्यात सामुग्री देत असतानाच फायर ऑडिट देखील करुन घेण्यात आले़ कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे़ जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क आहे़
- डॉ़ एम़ पी़ सांगळे, जिल्हा शल्यचिकित्सक, धुळे