लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील वडजाई रोडवर आदीलशहा गुलाबशहा फकीर (रा़ वडजाई रोड, शिवाजी नगर, धुळे) यांचे भंगार वस्तूचे गोडावून आहे़ या गोडावूनजवळ रविवारी पहाटे अचानक आग लागली़ यात भंगार वस्तूंसह जनावराचा मृत्यू झाला आहे़ दरम्यान, यात कितीचे नुकसान झाले याचा अंदाज अद्यापही अस्पष्ट आहे़ मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे़ शहरातील वडजाई रोडवर असलेल्या कब्रस्थाननजिक आदीलशहा गुलाबशहा फकीर (रा़ वडजाई रोड, शिवाजी नगर, धुळे) यांच्या गोडावूनजवळ पहाटे आग लागली़ यात भंगार वस्तूंसह अडगळीचे सामान जळून खाक झाले़ याशिवाय या आगीचा फटका एका जनावरालाही बसला असून त्यात त्याचा मृत्यू झाला़ आगीचे वृत्त कळताच महापालिकेचा अग्नीशमन बंब घटनास्थळी दाखल झाला होता़ पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणण्यात आली़ आग सकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या दरम्यान लागली असावी असा अंदाज आहे़ मोहाडी पोलीस स्टेशनला अग्नी उपद्रवची नोंद घेण्याचे काम सुरु आहे़
धुळ्यात भंगार गोडावूनजवळ आग, जनावराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 11:48 IST
वडजाई रोड : अग्नी उपद्रवची पोलिसात नोंद
धुळ्यात भंगार गोडावूनजवळ आग, जनावराचा मृत्यू
ठळक मुद्देवडजाई रोडवर गोडावूनजवळ आगभंगार वस्तूसह जनावराचा मृत्यूनुकसानीचा अंदाज अस्पष्ट