शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

लग्न, अंत्ययात्रेत गर्दी केल्यास गुन्हे दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 11:09 PM

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : संसर्ग रोखण्यासाठी कठोर पाऊल

धुळे/शिरपूर : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर विवाह आणि अंत्यसंस्कारासाठी गर्दी वाढत आहे. त्यातून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा समारंभावर लक्ष्य ठेवण्यासाठी पोलिस पाटील, तलाठी आणि ग्रामसेवक यांची संयुक्त समिती गठित करण्यात यावी. नियमांपेक्षा अधिक गर्दी असेल तर संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत. त्यासाठी ग्रामसेवकांनी फिर्याद द्यावी असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत़शिरपूर तालुक्यासह जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ मृतांचा आकडाही वाढू लागला आहे़ संसर्गाचे आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तपासणीची व्यापक मोहिम राबविण्याच्या सूचनाही त्यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत़जिल्हाधिकाºयांनी शनिवारी शिरपूर येथे भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर नगरपालिकेच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी आमदार काशीराम पावरा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे, शिरपूरचे उपनगराध्यक्ष भूपेश पटेल, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसीलदार आबा महाजन, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागूल, पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, माजी मंत्री अमरिशभाई पटेल आदी उपस्थित होते.शिरपूर तालुक्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ४५ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाची तपासणी करून संशयित रुग्णांचे स्वॅब घेऊन अहवाल प्राप्त करुन घ्यावेत़ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. त्यांनतरही शिरपूर तालुक्यात रुग्ण संख्या वाढत आहे. ही काळजीची बाब आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने आता तपासणीसाठी व्यापक मोहीम राबवावी. रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक असेल अशा नागरिकांची तपासणी करण्यात यावी. यात कोणाला उपचाराची आवश्यकता भासली तर तत्काळ रुग्णालयात दाखल करुन औषधोपचार सुरू करावेत असे आदेश त्यांनी दिले़शिरपूर येथील वाढती रुग्ण संख्या पाहता अंबिका नगरात घशातील स्रावांचे नमुने घेण्यासाठी संकलन केंद्र सुरू करावे, जनजागृतीवर भर द्यावा तसेच बोराडी येथील आयुर्वेद महाविद्यालयात कोविड केअर हेल्थ सेंटर सुरू करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या़

टॅग्स :Dhuleधुळे