शहरातील वरखेडी रोड सुभाषनगरात राहणारे वाल्मीक सुकलाल धनगर या सिक्युरिटी गार्डने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, रविवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास मुलगा योगेश धनगर याला किराणा दुकानावर तंबाखूची पुडी घेण्यासाठी पाठविले होते. रस्त्यात योगेश याला लोकेश सूर्यवंशी, पवन सूर्यवंशी रा. सूर्योदय कॉलनी यांनी अडविले आणि त्याच्या कानशिलात मारली. थोड्यावेळाने राजू बडगुजर याने येऊन मारहाण केली. मुलगा घरी आला असता चौघेजण घरी आले. योगेश धनगर आणि त्याच्या आई-वडिलांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. यावरून लोकेश सूर्यवंशी, पवन सूर्यवंशी, राजू बडगुजर, तुषार रोकडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसऱ्या गटाकडून सूर्योदय कॉलनी येथील पवन शालिग्राम सूर्यवंशी याने फिर्याद दाखल केली. रविवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास मागील भांडणाची कुरापत काढून योगेश, कुंदन पाटील, चांडा भाई, वाल्मीक यांनी घरात घुसून कोयत्याने परिवाराला मारून टाकण्याची धमकी दिली. आईला धक्काबुक्की केली. धमकी देत चारजणांनी पवन याला मारहाण केल्याचे दाखल फिर्यादीत म्हटले आहे. यावरून चौघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली. आझादनगर पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.