धुळे : जिल्ह्यातील आणखी १५ अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यतील एकूण बाधित रुग्णांची संख्या १३ हजार ९८३ इतकी झाली आहे. बुधवारच्या अहवालानुसार, जिल्हा रुग्णालय धुळे येथील सर्व १६० अहवाल निगेटिव्ह आले. उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील ३ अहवाल निगेटिव्ह आले.तसेच रॅपिड अँटीजन टेस्टच्या २६ अहवालांपैकी ३ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात, राम मंदिर जवळ दोंडाईचा २ व मालपुर ता शिंदखेडा येथील एका ररुग्णाचा समावेश आहे. उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील सर्व १५४ अहवाल निगेटिव्ह आले. तसेचरॅपिड अँटीजन टेस्ट चा महालक्ष्मी कॉलनी शिरपूर येथील एक अहवाल पॉझिटीए आला आहे. भाडणे साक्री कोविद सेंटर येथील सर्व ३५ अहवाल निगेटिव्ह आले. तसेच रॅपिड अँटीजन टेस्टच्या ३ अहवालांपैकी २ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात, देसले गल्ली, कासारे व दिघावे येथील एका रुग्णाचा समावेश आहे. महानगरपालिकेच्या कोविड सेंटर येथील रॅपिड अँटीजन टेस्टच्या २८८ अहवालांपैकी अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात, दक्षता पोलीस सोसायटी साक्री रोड १ व महिंदळे येथील एका रुग्णाचा समावेश आहे.शासकीय महाविद्यालयातील सर्व १४ अहवाल निगेटिव्ह आले.खाजगी प्रयोगशाळेतील, १२ अहवालापैकी ७ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात, सहजीवन नगर १, शांती नगर १, वरसुस ता शिंदखेडा १, गल्ली क्रमांक दोन १, जलाराम मंदीर जवळ, नटराज थिएटर १, स्वामी विवेकानंद सोसायटी नकाने रोड १ व पाटीदार भवन जवळ पारोळा रोडयेथील एका व्यक्तीचा समावेश आहे.
पंधरा अहवाल पॉझिटिव्ह, एकही मृत्यू नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 11:38 IST