दुष्काळ जाहीर करण्यास शेतकऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 10:18 PM2020-08-04T22:18:08+5:302020-08-04T22:18:28+5:30

देशातील पहिलीच घटना : कृषिभूषण शेतकऱ्यांचे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाला दिले निवेदन

Farmers oppose declaring drought | दुष्काळ जाहीर करण्यास शेतकऱ्यांचा विरोध

dhule

Next

धुळे : जिल्ह्यातील शेतकºयांनी दुष्काळ जाहीर करण्यास विरोध केला आहे़ आणेवारी वाढवून शेतकºयांना पिक विम्याची भरघोस रक्कम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी कृषिभूषण शेतकºयांनी केली आहे़
दुष्काळ जाहीर करण्यास विरोध दर्शविण्यासाठी शेतकºयांनी आंदोलन केल्याची ही देशातील कदाचित पहिलीच घटना असावी, अशी प्रतिक्रिया प्रकाश पाटील यांनी दिली़
निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान पिक विमा योजना अतिशय चांगली आहे. धुळे जिल्ह्यातील शेतकºयांसाठी मात्र ही योजना नुकसानकारक ठरत आहे़ दुष्काळ दाखवुन दुष्काळी मदत मिळण्यासाठी गाव पातळीपासून ते जिल्हा स्तरावरील सर्वपक्षीय राजकीय नेतृत्व शासन, प्रशासनावर दबाव टाकताना दिसते. स्थानिक तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक देखील शेतकºयांना फायदा व्हावा म्हणुन दुष्काळ जाहीर होण्याच्या उद्देशाने हेतुपुरस्सर पिक कापणी प्रयोगाची आकडेवारी आहे त्यापेक्षा अतिशय कमी दाखविण्याचा प्रयत्न करतात़ यामुळे पिक विमा योजनेतील उंबरठा उत्पादन म्हणजेच मागिल पाच वषार्ची सरासरी प्रशासनाच्या दफ्तरी अत्यंत कमी दिसते़ बेटावद महसुल मंडळाचे कापसाचे उंबरठा उत्पादन प्रति हेक्टरी ४.७५ क्विंटल आहे. यापेक्षा कमी उत्पादन आले तरच व तेवढीच नुकसान भरपाई मंजुर होईल. या कारणांमुळे धुळे जिल्हा वास्तव पिक विमा नुकसान भरपाई पासुन वंचित झालेला आहे.
यंदाचा आतापर्यंतचा हंगाम चांगला आहे. त्यामुळे यावर्षी नुकसान भरपाई मंजुर होण्याची शक्यता कमी आहे. भविष्यात चांगली नुकसान भरपाई हवी असेल तर उंबरठा उत्पादन वाढविणे गरजेचे आहे. उंबरठा उत्पादन वाढविण्यासाठी दुष्काळ न दाखविता १०० पैसे पर्यंत आणेवारी दाखविणे महत्त्वाचे आहे.
त्यामुळे दुष्काळ जाहिर न करता आणेवारी वाढवून शेतकºयांना पिक विम्याची भरघोस नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी पढावद अ‍ॅड़ प्रकाश भुता पाटील, वडणे येथील दिलिप पाटील, धुळ्याचे प्रभाकर चौधरी, सुधाकर बेंद्रे, मुकटीचे सुदीप पाटील, साक्रीचे ललित देवरे, शिरपूरचे जनार्दन पाटील, अरुण पाटील या कृषिभूषण शेतकºयांसह आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील सोनगीर आदींनी केली आहे़
याबाबत खासदार डॉ़ सुभाष भामरे, आमदार मंजुळा गावीत, जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिरूदेचे अध्यक्ष तुषार रंधे, उपाध्यक्ष कामराज, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बापु खलाणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पी़ एम़ सोनवणे आदींना निवेदन देण्यात आले़
दुष्काळ जाहीर करण्यास शेतकºयांनी पहिल्यांदाच विरोध केला़

Web Title: Farmers oppose declaring drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे