शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

वाहन परवान्यांची मुदत वाढवली, योग्यता प्रमाणपत्रांनाही मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 22:49 IST

आरटीओ कार्यालय : चाचणी शीबिरे काेरोनामुळे रद्द

धुळे :  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वाहन चालविण्याचा परवाना तसेच वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र यांची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. शिवाय वाहन चालक परवाना देण्यासाठीची तालुकास्तरीय शीबिरे रद्द केली आहेत. रस्ते परिवहन व राजमार्ग मंत्रालयाने जारी केलल्या मार्गदर्शक सूचनेनुसार ज्या वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र, परवाना, वाहन नोंदणी कागदपत्रे, तसेच अनुज्ञप्तीची वैधता १ फेब्रुवारीपासून संपली आहे किंवा ३१ मार्च २०२१  पर्यंत संपणार आहे, अशा कागदपत्रांच्या नूतनीकरणाला लॉकडाऊनमुळे विलंब होत आहे. अशा कागदपत्रांची वैधता ३० जूनपर्यंत वैध आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिली.संगणकीय ऑनलाइन प्रणालीमध्ये नोंदणीकृत परिवहन संवर्गातील वाहनाचा थकीत, चालू कर भरण्याची सुविधा परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्याद्वारे कराचा भरणा करून वाहनांच्या संचलनास कोणताही अडथळा येणार नाही, असे स्पष्ट केले आहे.कोरोनामुळे वर्षभरापासून मुदतवाढ मिळत आहे.प्रादेशिक परिवहन कार्यालय अंतर्गत येणाऱ्या तालुकास्तरावरील शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती चाचणीसाठी वार्षिक शिबिर आयोजित करण्यात येते. परंतु, कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने १ ते १५ एप्रिल या कालावधीतील अनुज्ञप्ती शिबिर पुढील आदेश होईपर्यंत रद्द करण्यात येत आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे