लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शेतकºयांना पिक कर्ज नाकारणाºया राष्ट्रीयकृत बँकांना समज द्या अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी दिला आहे. गुरूवारी त्यांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले.खरीप पिक हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकºयांना बँकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. दरवर्षी राष्ट्रीयकृत बँका पिक कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. शेतकºयांच्या बाबतीत वेळकाढू धोरण अवलंबले जाते परिणामी त्यांना बँकेत अनेक फेºया माराव्या लागतात. बँका कर्ज देत नाहीत म्हणून सावकारी कर्जाचा मार्ग शेतकºयांना स्वीकारावा लागतो. व तेच सावकारी कर्ज त्यांच्या आत्महत्येचे कारण ठरते. शेतकºयांना आत्महत्येपासून परावृत्त करायचे असेल तर राष्ट्रीयकृत बँकांनी वेळीच कर्जपुरवठा केला पाहिजे असे निवेदनात म्हटले आहे. आधीच कोरोनाची महामारी सुरू आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कर्जपुरवठा करणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हाधिकाºयांनी सर्व राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकाºयांची बैठक घेऊन पिक कर्ज देण्याबाबत सुचना कराव्यात. पात्र शेतकºयांना कर्ज नाकारले तर बँकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन छेडले जाईल असा इशारा शिवसेनेने दिला आहे.निवेदनावर अतूल सोनवणे, कैलास पाटील, आधार हाके, विलास चौधरी, धनंजय कासार, देवराम माळी यांच्या सह्या आहेत.
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाºया बँकांना समज द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 21:38 IST