शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

साक्री तालुक्यातील टिटाणे परिसरात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 9:46 PM

नुकसानीचा अंदाज : जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

निजामपूर : साक्री तालुक्यात माळमाथ्यावर टिटाणे परिसरात मुसळधार पाऊस झाला़ गाव परिसरासह शेती जलमय झाली़ रस्त्यावरुन नदीप्रमाणे पुराचे पाणी वाहत होते़ पावसामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त होते आहे.निजामपूरकडून येणारी व खोरीकडून येणारी वाहने दोन्ही बाजूस खोळंबून उभी होती़ बाहेर गावाहून येणारा एक मोटर सायकलस्वार नदी प्रमाणे वेगात वाहणाऱ्या पाण्यातून जेमतेम गावात आला. त्याचे पाहून पाठीमागून येणारा दुसरा मोटर सायकल स्वार प्रवाहात गाडीसह वाहू लागला. लोकांनी हातातून गाडी सोडण्याची हाकाटी केली पण त्याने ती सोडली नाही. तरुणांनी पाण्यात जाऊन त्याला वाचविले. शुक्रवारी सायंकाळी साडे चार वाजे पासून मेघ गर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावत चांगलेच झोडपून काढले़ तब्बल अडीच तास पावसाचा जोर कायम होता. भिकन बागुल यांनी झालेली विदारक स्थिती पाहून अतिवृष्टी झाल्याचे म्हटले आहे. शेतांमध्ये मोठे तलाव साचले आहेत. शेतांमधून नदी प्रमाणे प्रवाह वाहत असून रस्त्याचे दोन्ही बाजूस वाहनांची कोंडी झाली होती़शेतात पेरलेली ज्वारी, बाजरी, कपाशी, मका, पिके पूर्णपणे पाण्यात बुडाली आहेत. सरपंच सबकदर पिंजारी, प्रवीण बागुल, भिकन बागुल, चुनीलाल बागुल, खुर्शीद पिंजारी यांनी या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी पिंपळनेर तहसीलदार, तलाठी, कृषी सहाय्यक यांना कळविले आहे. शनिवारी सकाळी किती व काय काय नुकसान झाले आहे ते स्पष्ट होईल असे सांगण्यात आले़सोनगीरलाही पाऊसधुळे तालुक्यातील सोनगीर आणि परिसरात पावसाने सायंकाळी हजेरी लावली़ तासभर पाऊस सुरु होता़नेर परिसरात मुसळधारधुळे तालुक्यातील नेर परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली़ सर्वदूर पाऊस झाला़वडजाईतही पाऊसधुळे तालुक्यातील वडजाई आणि परिसरात पावसाने हजेरी लावली होती़ शेती कामाला सुरुवात होणार असल्याने बळीराजा आनंदीत आहे़धुळ्यातही पावसाची हजेरी, वीज पुरवठा खंडीतधुळे शहरात दुपारी कडकडीत ऊन पडले होते़ पाऊस येईल असे काही चिन्हे नसताना अचानक ढग भरुन आले आणि पावसाला सुरुवात झाली़ तासाभराच्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता़ अनेकांची धावपळ उडाली़ काही ठिकाणी विजेचा पुरवठा खंडीत झाला़

टॅग्स :Dhuleधुळे