येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना नागरी व ग्रामीण प्रकल्प १ ते ३० सप्टेंबर या काळात संपूर्ण जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकाचा माह जनजागृती अभियान राबविण्यात येते. यामध्ये अंगणवाडी सेविका या गावोगावी आपल्या हद्दीत 0- ६ वयोगटांतील बालके कुपोषित राहू नये म्हणून जनजागृती करतात. प्रत्येक मुलगा-मुलगी तिच्या जन्माचे स्वागत करतात, माता ही गरोदर असल्यापासून तिचे बालक दोन वर्षांपर्यंत होईपर्यंत तिचा आहार काय असावा तसेच बालकास मातेचे दूध, आरोग्य, स्वछता, लसीकरण,
ॲनिमिया थांबविणे, सकस आहार काय हवा याबाबत घरोघरी माहिती पुरवतात त्यावेळी बालकांना शासनाच्या कोणत्या योजनाचा लाभ देता येईल हे ही सांगतात.
कार्यक्रमास सहायक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी तृप्ती घोडमिसे, गटविकास अधिकारी वाय. डी. शिंदे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी सचिन शिंदे उपस्थित होते. यावेळी बालकल्याण समिती सदस्य व समुपदेशक प्रा. वैशाली पाटील यांनी स्त्रीचे मानसिक आरोग्य यावर मार्गदर्शन केले. यावेळी उपसभापती भय्यासाहेब पाटील, गटशिक्षणाधिकारी सुरेखा देवरे, तालुका आरोग्य अधिकारी टी. बी. पटेल, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी सतीश पाटील, संस्थापक संरक्षण अधिकारी तृप्ती पाटील यांच्यासह अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते.
मेळाव्याचे प्रास्ताविक बालविकास प्रकल्प अधिकारी हेमंत भदाणे यांनी केले, तर सूत्रसंचालन उज्ज्वला सूर्यवंशी व सुनीता खैरनार यांनी केले.