शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

महापालिकेच्या मॉडेल रोडवर पुन्हा अतिक्रमणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 12:32 PM

 लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : शहरातील संतोषी माता ते दसेरा मैदान पर्यतच्या रस्ते कामांसाठी शासनाकडून दहा कोटीचा निधी खर्च ...

 लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील संतोषी माता ते दसेरा मैदान पर्यतच्या रस्ते कामांसाठी शासनाकडून दहा कोटीचा निधी खर्च करून हा रस्ता मनपाकडून मॉडलरोड तयार करण्यात आलेला आहे. मात्र अतिक्रमण धारकांचे पुर्णवसनाचा प्रश्न न सुटल्याने पुन्हा या ठिकाणी अतिक्रमण होत आहे.मनपाकडून शिवतीर्थे ते दसेरा मैदान पर्यंतचा रस्ता मॉडेल रोड तयार करण्यात येत आहे. या कामसाठी शासनाकडून दहा कोटींचा निधी दोन वर्षापूर्वी मंजूर झाला होता. या रस्त्याचे काम दोन वर्षापासून सुरु आहे. या दोन किलोमीटरच्या रस्त्यावर यापुर्वी ३५० घरांचे अतिक्रमण होते. न्यायालयाच्या आदेशाने येथील अतिक्रमण काढण्यात आले होते. मात्र अतिक्रमण धारकांचा पुर्नवसनाचा प्रश्न न सुटल्याने या रस्त्यालगत पुन्हा ७७ नागरिकांनी तर १० व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत.मनपाकडून अतिक्रमण धारकांचा प्रश्न सोडविल्याशिवाय हा मॉडेल रोड तयार होणार नाही. या रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण होण्यास सुरवात झालेली आहे. त्यामुळे पुन्हा वाहतूकीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.झोपड्याचे अतिक्रमण सर्वाधिकरस्त्यावरील अतिक्रमण काढल्यानंतर हा रस्ता मोकळा झालेला होतो. त्यानंतर रस्त्याचे काम होण्यापुर्वी गॅरेज, हॉटेल, पान टपरी तसेच किराणा व लहान व्यवसायिकांनी दुकाने लावली होती. मात्र रस्त्याचे काम झाल्यानंतर अनेक रहिवाशांनी झोपडी तयार करून राहण्यास सुरूवात केली आहे.