शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

Vidhan Sabha 2019 : मतदानाचा टक्का वाढण्यासाठी जनजागृतीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 22:56 IST

जिल्हाधिकारी गंगाथरन डी. : आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालनाकडेही प्रशासनाचे बारीक लक्ष

धुळे - राज्य विधानसभेसाठी होणाऱ्या यंदाच्या निवडणुकीत मतदानाच्या प्रमाणात वाढ व्हावी यावर भर दिला आहे. त्यासाठी स्वीप कार्यक्रमांतर्गत जनजागृती करण्यात येत आहे. शाळा-महाविद्यालयांसह शिक्षक व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पथनाट्य, रॅली, मतदानासाठीच्या इव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रांचे प्रात्यक्षिक जिल्ह्यातील नागरिकांना दाखविण्यात येत असून त्याचा निश्चित फायदा होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी व्यक्त केला.जिल्हा प्रशासनातर्फे राज्य विधानसभा निवडणुकीसाठी काय तयारी करण्यात आली किंवा करण्यात येत आहे, या संदर्भात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी काही महत्त्वपूर्ण प्रश्नांवर मनमोकळा संवादही साधला़प्रश्न : स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदारांच्या जागृतीसाठी अजून काय केले जाणार आहे.?गंगाथरन डी. : मुले चाणाक्ष असल्याने त्यांचे प्रबोधन केल्यास ते पालकांना आवर्जून माहिती देतात. त्यामुळे मुलांना मतदानाची माहिती व्हावी, त्याचे महत्त्व कळावे, यंत्रांद्वारे मतदान कसे करावे यासाठी त्यांच्याकरीता कविता, वक्तृत्व व निबंध तसेच चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहेत.प्रश्न : आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी कसे प्रयत्न केले जाणार आहेत ?गंगाथरन डी. : या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत सनियंत्रण समिती कार्यरत आहे. तसेच कोणी आचारसंहितेचा भंग करत असेल, तर कोणीही त्याबाबत व्हीडीयो, फोटो काढून सी-व्हिजिल या मोबाईल अ‍ॅपद्वारे पाठवू शकतो. ते प्राप्त होताच लोकेशन (मतदारसंघ) घेऊन त्याबाबत नेमलेल्या भरारी पथकाद्वारे त्वरित कारवाई केली जाते. कोणी कुठे विनापरवानगी फलक लावत असेल, पैशांचा संशयास्पद व्यवहार, राजकीय पक्षांच्या रॅलीत शासकीय अधिकारी, कर्मचाºयांचा सहभाग याबाबत कोणालाही माहिती, फोटो अपलोड करता येऊ शकते.प्रश्न : निवडणूक काळात कायदा- सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी काय उपाय करणार?गंगाथरन डी. : या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर उपाय योजले जातील. त्यासाठी पोलीस विभाग व उपविभागीय अधिकारी हे हद्दपारी, शस्त्र परवाना जप्त तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई या संदर्भात उपाययोजना संदर्भात कार्यवाही सुरू झाली आहे.प्रश्न : निवडणूक प्रक्रियेबाबत राजकीय पक्ष, पदाधिकाºयांना माहिती देण्यासाठी काय कार्यवाही होत आहे?गंगाथरन डी. : निवडणुकीच्या घोषणेनंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. तिचे पालन, प्रचार खर्च, प्रचारासाठी लागणाºया आवश्यक परवानग्या व अन्य बाबी संदर्भात राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठका घेऊन याबाबत सांगोपांग माहिती दिली जात आहे. त्यांच्या काही शंका, समस्या असतील तर त्यांचेही निराकरण करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यासाठी त्यांचेही सहकार्य मिळत आहे. काही अडचणी असल्यास प्रसंगी ते माझ्याशीही संपर्क करू शकतात.प्रश्न : मतदान ओळखपत्रांचे वाटप, निवडणूक कर्मचाºयांचे प्रशिक्षण याबाबत काय सांगाल?गंगाथरन डी. : मतदार नोंदणीसाठी राबविलेल्या विशेष मोहिमेनंतर २१ हजार नव्या मतदारांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. ते प्राप्त होताच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ)मार्फत त्याचे वाटप सुरू आहे.निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाºयांना दोन वेळा प्रशिक्षण दिले जाईल. २ आॅक्टोबर रोजी पहिले प्रशिक्षण होईल. इतर संबंधित अधिकाºयांचे यापूर्वीच प्रशिक्षण झाले आहे. प्रचारासाठी लागणाºया विविध परवानग्यांसाठी एक खिडकी योजना राबविली जाणार आहे.

टॅग्स :Dhuleधुळे