शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाच्या धडकेत प्राथमिक शिक्षिका जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 12:37 IST

नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्ग : संतप्त नागरीकांना महामार्गच खोदला

लोकमत न्यूज नेटवर्कसाक्री : साक्री शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेने प्राथमिक शिक्षिका भावना पाटील या जागीच मरण पावल्या आहेत़ या अपघातामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी रात्री महामार्ग रोखून धरला होता़ यामुळे सुरतकडे व धुळेकडे जाणाºया मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती़ यावेळेस संतप्त नागरिकांनी महामार्ग खोदून आपला निषेध व्यक्त केला आहे़ पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मृतदेह साक्रीच्या  ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला़ या दु:खदायी घटनेमुळे शहरात एकच शोककळा पसरली आहे. भावना अविनाश पाटील या सुरपान येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या़ त्यांचे पती अविनाश पाटील हे दहीवेल येथील उत्तमराव पाटील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरीस आहेत़ भावना पाटील या महामार्ग लगत असलेल्या श्रीरंग कॉलनीतून रात्रीच्या सुमारास महामार्गावर फिरण्यासाठी गेल्या होत्या़ त्यावेळेस आयटीआय साक्रीच्या गेटसमोर त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली़ या वेळेस त्यांचे शरीराचे तुकडे इतरत्र पसरले होते़ अपघात झाल्यानंतर बºयाच वेळपर्यंत त्यांची ओळख पटत नव्हती़ रस्त्याच्या कडेला त्यांचा मोबाईल पडलेला होता़ त्या मोबाईल वरून त्यांची ओळख पटली़ त्यांनी शेवटचा फोन आपले पती अविनाश पाटील यांना केला होता़ अविनाश पाटील हे पुणे येथे मुलीच्या परीक्षेच्या निमित्ताने गेले होते़ तर त्यांची मुलगीही नाशिक येथे परीक्षेसाठी गेली होती़ दोघे मुलगी व वडील हे रात्री नाशिकहुन परत येत असतानाच प्रवासात त्यांना या अपघाताची माहिती कळविण्यात आली़ त्यामुळे त्यांना प्रचंड धक्का बसला़  अपघात झाल्यानंतर महामार्गावर लोकांनी प्रचंड गर्दी केली होती़ ज्या ठिकाणी अपघात झाला, त्या ठिकाणी वळण रस्ता आहे़ रस्त्याच्या कडेला असलेले लिंबाचे झाड असल्याने हा अपघात झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे़

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात