धुळ्यात भिंतीला भगदाड पाडून ४५ हजारांची दारु लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 07:03 PM2020-01-14T19:03:20+5:302020-01-14T19:03:42+5:30

अवघ्या अर्ध्यातासात चोरट्यांनी केली हातसफाई, गुन्हा दाखल

Dusting the wall in dust, 3,000 worth of liquor is dumped | धुळ्यात भिंतीला भगदाड पाडून ४५ हजारांची दारु लंपास

धुळ्यात भिंतीला भगदाड पाडून ४५ हजारांची दारु लंपास

Next

आॅनलाइन लोकमत
धुळे :मोहाडी उपनगरातील एका वाईन शॉपच्या भिंतीला भगदाड पाडून चोरांनी आतमध्ये शिरुन सुमारे ४५ हजार ३०० रुपयांची दारुसह अन्य वस्तू लांबविण्यात आल्या़
चोरट्याने अवघ्या अर्ध्यातासात ही हातसफाई केली असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे़ चोरीची ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली़ या प्रकरणी दोन चोरट्याविरुध्द मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़ दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेराचे काही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़
मोहाडी उपनगर परिसरात श्रध्दा वाईन शॉप असून त्याचे मालक दर्शनलाल कोडवाणी आहेत़ शनिवारी रात्री मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाच्या भिंतीला थेट भगदाड पाडले़ त्यानंतर रविवारी पहाटे १ वाजून २८ मिनीटांनी एका चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला़ त्यानंतर त्याने एक एक करीत मद्याच्या बाटल्या भगदाडातून पलिकडे असलेल्या दुसऱ्या सहकाºयाकडे दिल्या़
दुकानात शिरलेल्या चोरट्याने डोक्यावर टोपी व चेहºयावर रुमाल बांधला होता़ त्यानंतर आतमध्ये शिरलेला चोरटा पहाटे २ वाजता दुकानाच्या बाहेर पडला़ चोरीस गेलेल्या मद्यसाठ्यामध्ये विविध कंपन्यांचे मद्य आहे़ त्याची ४५ हजार ३०० रुपये इतकी किंमत आहे़
सकाळी नेहमीप्रमाणे दुकान मालक कोडवाणी दुकान उघडण्यासाठी आले असता चोरी झाल्याचा आणि भिंतीला भगदाड पाडले असल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला़ यानंतर त्यांनी ही बाब मोहाडी पोलिसांना कळविली असता पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले़ याप्रकरणी दर्शनलाल कोडवाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे़ या चोरीमुळे खळबळ उडालेली आहे.

Web Title: Dusting the wall in dust, 3,000 worth of liquor is dumped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे