शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रक आदळला एकाचा जागेवर मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 19:09 IST

चाळीसगाव चौफुली : एक जखमी रुग्णालयात

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : भरधाव वेगाने येणारा ट्रक उभ्या ट्रकवर आदळल्याने सहचालकाचा जागेवरच मृत्यू ओढवल्याची घटना चाळीसगाव चौफुलीनजिक घडली़ या अपघातात एक जखमी झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील चाळीसगाव चौफुली जवळ एमएच २८ एबी ८१७५ क्रमांकाच्या ट्रकवर पाठीमागून येणारा ट्रक आदळल्याने मागील ट्रकच्या कॅबिनचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता़ कॅबिनमध्ये झोपलेले सहचालक रामदास भास्कर मजल (रा़ कन्नड जि़ औरंगाबाद) यांना जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू ओढवला़ तर ट्रकवरील चालक हे गंभीर जखमी झाले आहेत़ रस्त्यावर उभा असणारा ट्रक हा मालेगावकडे जाण्यासाठी उभा होता़ तर पाठीमागून पारोळा रोडकडून येणारा एमएच २० डीई ७००० या क्रमांकाचा ट्रक उभ्या असणाºया ट्रकवर आदळला़ परिणामी ट्रकच्या कॅबिनची आणि दुसºया ट्रकचा मागील भागाचा चेंदामेंदा झाला़ एक ट्रक दुसºया ट्रकमध्ये घुसल्याने क्रेनची मदत घेऊन त्यांना बाजुला करण्यात आले़ या अपघातात जखमी झालेल्या दोघांना उपचारार्थ हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले़ तत्पुर्वी या अपघातातील सहचालक याचा मृत्यू ओढवला़ चालकाला डुलकी आली असावी आणि यातून अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे़ या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती़ अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव रोड पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले़ दोन्ही वाहने बाजुला केल्यावर विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली़ दरम्यान, या ना त्या कारणाने महामार्गावर वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात़ त्यातून अशा प्रकारचे अपघात होत असल्याने पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात