शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळा़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 22:27 IST

आरोग्य : जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांचे नागरीकांना आवाहन

धुळे : डेंग्यू ताप हा फ्ल्यूसारखा ताप आहे़ तो डेंग्यू विषाणूपासून होतो़ तो टाळण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा़ यादिवशी घरातील सर्व भांडी मोकळी करुन घासून पुसून स्वच्छ ठेवावी़ असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे़राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत १६ मे हा दिवस राष्ट्रीय डेंग्यू दिवस म्हणून साजरा केला जातो़ या आजाराने होणारे मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यास शासनाला यश आले आहे़ जिल्ह्यात विविध कारणामुळे या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसते़ हा आजार डासामुळे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे़ डेंग्यू संसर्गित व्यक्तीस डास चावल्यावर वरील प्रकारचा डास संसर्गित होतो़ त्यानंतर तोच डास निरोगी व्यक्तीस चावल्यास त्या व्यक्तीला डेंग्यूचा संसर्ग होतो़ डास चावल्यानंतर पाच ते सात दिवसानंतर डेंग्यू आजाराची लक्षणे दिसायला लागतात़एडिस डासाची लांबी पाच ते सहा मिलीमीटर असते़ या डासाच्या अंगावर पांढरे पट्टे असतात़ त्यामुळे त्याला टायगर मॉस्क्यूटो असेही म्हणतात़ तो दिवसा चावतो़ वायर, छत्री, दोरी, काळे कपडे आदी लोंबकरणाºया ठिकाणी हा डास विश्रांती घेतो़ त्याची अंडी वर्षभर पाण्याशिवाय राहू शकतात़ वर्षभरानंतर पाणी उपलब्ध होताच त्यातून अळी तयार होते़ त्यामुळे डास अळी असलेली भांडी घासून-पुसून स्वच्छ करावी़ जेणेकरुन पृष्ठभागाला चिकटलेली अंडी नष्ट होतील़तीव्र ताप येणे, डोके दुखी, उलटी, अंग दुखी, डोळ्यांच्या खोबणीमध्ये दुखणे, अंगावर लालसर पुरळ येणे, तीव्र पोट दुखी आणि गंभीर रुग्णास रक्तस्त्राव अशी या आजाराची लक्षणे आहेत़ एडीस डासाला रोखण्यासाठी आपला परिसर स्वच्छ ठेवावा़ घर आणि परिसरातील पाणी साचू शकतील अशा निरुपयोगी वस्तू नष्ट कराव्यात़ खराव टायर पंक्चर करावे़ टायरमध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घेण्यात यावी़ पाण्याची भांडी, ड्रम, रांजण व्यवस्थित झाकून ठेवावेत़ झाकण नसल्यास जुन्या कपड्याने झाकून ठेवावेत़ पाण्याची भांडी झाकल्याने त्यात डास अंडी घालू शकणार नाहीत़ घरावरील टाक्यांना झाकण बसवावेत़ शौचालयाच्या व्हेंट पाईपला जाळी बसवावी़परिसरातील डबकी वाहती करावीत अथवा बुजवावीत़ मोठ्या डबक्यांमध्ये गप्पी मासे सोडवावेत़ परिसर स्वच्छ ठेवावा़ जे कंटेनर रिकामे करता येणार नाहीत अशा कंटेनरमध्ये टेमिफॉस या अळी नाशकाचा वापर करावा़ जैविक नियंत्रण पध्दतीने डास निर्मिती होऊ न देणे, डासोत्पती स्थाने नष्ट करणे, गप्पी माशांचे संगोपन करणे, कायमस्वरुपी डासोत्पत्ती स्थानात गप्पी मासे सोडणे, फुटके माठ, रांजण, कुंड्या, बाटल्या, निकामी टायर आदींची विल्हेवाट लावावी़या डासांपासून संरक्षणासाठी मच्छरदाणीचा वापर करावा़ वैयक्तिक सुरक्षतेसाठी झोपताना विशेषत: कीटकनाशक भारीत मच्छरदाणीचा वापर करावा़ डास प्रतिबंधक मलम, अगरबत्तीचा वापर करावा़ घराच्या खिडक्यांना बारीक जाळीचे पडदे लावावेत़ डेंग्यू तापाची लागण झाल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जावून रक्ताची तपासणी करावी़

टॅग्स :Dhuleधुळे