धुळे ग्रामीणमधील १६९ गावात औषधांची होणार फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 01:14 PM2020-03-27T13:14:23+5:302020-03-27T13:14:44+5:30

जवाहर मेडीकल फाऊंडेशनमध्ये बैठक : आमदार पाटील यांच्या सूचना

Drugs will be sprayed in 90 villages in Dhule village | धुळे ग्रामीणमधील १६९ गावात औषधांची होणार फवारणी

धुळे ग्रामीणमधील १६९ गावात औषधांची होणार फवारणी

Next

धुळे : राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढत असून धुळे जिल्ह्यातही आवश्यक ती काळजी घेण्याची गरज निर्माण झालेली आहे. आमदार कुणाल पाटील यांनी कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक ती बैठक घेत अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या. या संदर्भात जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या एसीपीएम मेडिकल कॉलेज व रुग्णालयात महत्त्वपूर्ण बैठक देखील त्यांनी घेतली़
या बैठकीसाठी डॉ. ममता पाटील, डॉ. विजय पाटील, डॉ. अरुण दोडामणी, किरण शिंदे, किरण पाटील, डॉ. शिवचंद्र सांगळे, बाळासाहेब भदाणे, अरुण पाटील, पंढरीनाथ पाटील, प्रदीप देसले, शिरीष सोनवणे, सुनील ठाकरे, बापू खैरनार, राघवेंद्र घोरपडे, डॉ़ मनिष पाटील, डॉ. तरन्नुम पटेल, बाबाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली धुळे तालुक्यातील १६९ गावांमध्ये कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत आरोग्य कर्मचारी यांच्या सहकार्याने कोरोना प्रतिबंधक औषधांची फवारणी करण्याचे काम सुरू झाले आहे.

Web Title: Drugs will be sprayed in 90 villages in Dhule village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे