लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शहरानजिक असलेल्या हॉटेल रेन्सीडेन्सी पार्कजवळ ट्रक आणि लग्नाचे वºहाड घेऊन जाणाºया लक्झरी बसला रविवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास अपघात झाला़ यात दोन जण ठार तर १० ते १२ जण जखमी झाले आहेत़ जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले़ लग्नाचे वºहाड घेऊन लक्झरी बस पाचोराकडून सुरतकडे जात असताना त्याचवेळेस भाजीपाला घेऊन जाणारा ट्रक नाशिकच्या दिशेने जात होता़ शहरानजिकच हॉटेल रेन्सीडेन्सी पार्क हॉटेलजवळ या दोघांमध्ये वळण रस्त्यावरच अपघात झाला़ अपघात इतका भिषण होता की दोनही वाहने रस्त्यावर आडवी झाली होती़ परिणामी तास ते दीडतास महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती़ घटनेची माहिती मोहाडी पोलिसांना कळताच सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले़ जखमींना तातडीने रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले़ तर क्रेनची मदत घेऊन दोनही वाहने उभी करण्यात आली़
धुळ्यानजिक पहाटे ट्रक-लक्झरी अपघात, २ ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 12:09 IST
महामार्गावरील घटना : जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु
धुळ्यानजिक पहाटे ट्रक-लक्झरी अपघात, २ ठार
ठळक मुद्देट्रक आणि लक्झरी यांच्यात भीषण अपघातदोन जण ठार तर दहा ते बारा जण जखमीरविवारी पहाटेची घटना