लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर :तालुक्यातील सावळदे येथील पुलावरून नदीत कोसळलेल्या वाहन चालकाचा मृतदेह रविवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास सापडला.शिरपूरकडून धुळ्याकडे जाणारा ट्रक भरधाव वेगाने जात असतांना पुलाच्या मध्यभागी आला असतांना अचानक पुढील टायर फुटले़ त्यामुळे गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे तो सरळ पुलाच्या कठडेपूर्वी लावण्यात आलेले मेटल बिंंब तोडून ट्रक पलटून नदी पात्रात पडल्याची घटना २० रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली.२१ रोजी सकाळी एकाचे प्रेत तरंगतांना दिसत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सावळदे येथील पट्टीचे पोहणारे तापी पुलावर गेलेत़ मात्र दभाशी तापी काठालगत एकाचे प्रेत तरंगतांना दिसून आल्यामुळे बाभुळदे येथील मच्छिमारांनी काढले़ परंतु ते प्रेत गाडीतील चालकाचे नव्हते़ सदर प्रेत परिसरात लिंबू विक्री करणारा इसमाचे असल्यामुळे नरडाणा पोलिसांनी शवविच्छेदनासाठी नेले़ त्यामुळे दुपारनंतर शोध कार्य करण्यात आले़दरम्यान, शिरपूर पोलिस ठाण्याचे हवालदार संजय अहिरे, इंद्रसिंग पावरा, जगन्नाथ माळी यांनी घटनास्थळी पहारा कायम ठेवला आहे़ अत्याधुनिक यंत्रसामुग्री नसल्यामुळे दुसऱ्या दिवशीही काहीच शोध घेता आलेला नाही़ पाण्यात पडलेले वाहन काढण्यासाठी मोठी के्रन जिल्ह्यात नाही़ यापूर्वी झालेल्या घटनेत, गाडी काढण्यासाठी इंदौर येथून के्रन मागविण्यात आल्या होत्या़ त्यानंतरच सदरचे वाहन पाण्याबाहेर काढण्यात यश आले होते़दरम्यान, रविवारी संध्याकाळी ५ वाजता सावळदे येथील मच्छिमार करणारे नारायण कोळी, श्रीराम कोळी, उत्तम सोनवणे, कैलास कोळी, सुनिल कोळी अशा ५ जणांनी बुडालेल्या वाहनाजवळ बोटद्वारे शोध कार्य सुरू केले़ त्यावेळी नरडाणा काठालगत एकाचे प्रेत तरंगतांना असल्याची माहिती मिळाल्यामुळे ते तपासासाठी गेलेत़ त्यावेळी ते प्रेत सावळदे काठावर आणण्यात आले़अपघात झाल्याचे वृत्त ठिकरी-बडवानी येथील लोकांना २० रोजी रात्री उशिरा कळल्यावर त्यांनी आज दुपारी ३ वाजता घटनास्थळी धाव घेतली़ खरगोन येथील भैय्यू खॉन हे आले असतांना त्यांनी प्रेताची ओळख पटवून एजाज खॉन निझाम खॉन (२८) लिखी ताख़रगोन हे असल्याचे पोलिसांना सांगितले़ यावेळी मयताचे वडील व मामा देखील उपस्थित होते, त्यांनीही प्रेत ओळखले़ १२ चाकी ट्रकमध्ये (गाडी क्रमांक एम़एच़१८-एए-९३९४) तांदुळ भरून ते निघाले होते़ सदर तांदुळ कोपरगांव येथे पोहचविण्यासाठी जात होता़ मात्र त्यांच्यासोबत कोण-कोण आहेत ते मात्र भैय्यू खान यास सांगता आले नाही़ सदर प्रेत शवविच्छेदनासाठी येथील उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले़ गाडीचा मालक देखील घटनास्थळी पोहचत असल्याचे सांगण्यात आले़ ते आल्यानंतर गाडी काढण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे़
तापीत बुडालेल्या वाहन चालकाचा मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 13:12 IST