शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

धुळ्याच्या यात्रेत ड्रॅगन ट्रेन दगडावर उभी; भाविकांची सुरक्षा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 16:50 IST

धोकादायक : पांझरा नदीपात्रात मुरूम व दगडाचा खच टाकून ठेवल्याने भाविकांना मार्गक्रमण करणे कठीण

ठळक मुद्देयात्रेत दाखल झालेले पाळणे व इतर साहित्य रात्रीच्या वेळी खुलून दिसावे; याउद्देशाने अनेक व्यावसायिकांनी या साहित्यांवर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. हे साहित्य चालविण्यासाठी विजेची गरज असते. त्यामुळे व्यावसायिकांना जे वीज कनेक्शन देण्यात आले आहे. ते कनेयात्रा सुरू होण्यापूर्वी पांझरा नदी पात्रालगत प्रस्तावित रस्ते कामे सुरू होती. त्यात यात्रा असल्यामुळे येथे येणाºया व्यावसायिकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात माती व दगडांचा खच टाकून कच्चा स्वरूपाचा रस्ता तयार करण्यात आला. परंतु, त्याही रस्त्याची पूर्णत: वाट लतसेच व्यावसायिकांना पाळणे, ट्रेन, ब्रेक डान्स व इतर साहित्य लावतानाही प्रचंड त्रास सहन करावा लागला. काही व्यावसायिकांना मिळालेली जागाही व्यवस्थित नसल्यामुळे अनेक व्यावसायिकांनी अद्याप साहित्यच लावले नसल्याचे चित्र येथे दिसून येते.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे  :  खान्देश कुलस्वामिनी एकवीरादेवी यात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. तरुणाई व लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी पांझरा नदीच्या पात्रात पाळणे,  ड्रॅगन ट्रेन व इतर मनोरंजनाचे साहित्य आले आहेत. परंतु, काही व्यावसायिकांनी ड्रॅगन ट्रेन बसविताना चक्क नदी पात्रात लाकडाच्या फळ्या तर काहींनी दगडावर ही ट्रेन उभी केली आहे. त्यामुळे भाविकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. दरम्यान, पांझरा नदीपात्राला लागून रस्ते विकासाची कामे सुरू असल्याने  येथील परिसरात यात्रोत्सवानिमित्ताने मुरूम व मातीचा खच टाकून कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे. परिणामी, या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एकवीरा देवी यात्रोत्सवानिमित्त येथील परिसरात चैतन्यमय वातावरण आहे. भाविकांना आकर्षित करतील, अशा वस्तू विक्रीसाठी विक्रेत्यांनी त्यांच्या दुकानावर ठेवल्या आहेत. खरेदी करणाºया भाविकांची संख्याही वाढत आहे. दुपारी कडाक्याचे ऊन असल्यामुळे यात्रेत दुपारी १२ ते ५ यावेळेत गर्दी कमी असली तरी सकाळी सहा ते बारा व सायंकाळी सहा वाजेनंतर यात्रेत गर्दी दिसून येत आहे. वाहनांना प्रवेशबंदी असतानाही घुसखोरी यात्रेत वाहनांना प्रवेश बंदी आहे. तरीही बाहेर गावाहून येणारे भाविक त्यांची वाहने थेट देवीच्या मंदिरापर्यंत आणत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सकाळच्यावेळी नेहरू चौक व पंचवटी परिसरात पोलीस राहत नसल्यामुळे त्याची संधी साधत अनेक भाविक त्यांची वाहने ही मंदिरापर्यंत घेऊन येतात. त्यानंतर ही वाहने बाहेर काढताना वाहनचालकांनाच मोठा त्रास होत आहे. 

मंदिर परिसरात नाराळाच्या किंमतीत वाढमंंदिर परिसरात यात्रोत्सवानिमित्त येणाºया भाविकांची संख्या वाढत आहे.  देवीला आलेले भाविक अहेर, ओटी व नारळ घेत असतात. भाविकांची गरज विचारात घेता, मंदिर परिसरातील विक्रेत्यांनी नाराळाच्या किंमतीत वाढ केली आहे. एक नारळ २५ ते ३० रुपये किंमतीने विक्रेते विक्री होत आहे. पूजेच्या साहित्यांमध्ये अहेराची साडी २०० ते २५० रुपयांपर्यंत विक्री होत आहे. गेल्यावर्षाच्या तुलनेत भाविकांचा पाहिजे; त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती येथील विक्रेत्यांनी  दिली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात व्यवसाय वाढेल, अशी अपेक्षा विक्रेत्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Dhuleधुळे