कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डाॅक्टर, कर्मचाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:34 AM2021-05-17T04:34:22+5:302021-05-17T04:34:22+5:30

धुळे : कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रकृती गंभीर असतानाही योग्य उपचार मिळाल्याने काेरोनावर मात करणे शक्य झाले, जिल्हा रुग्णालयाने जीवदान ...

Doctors, staff treating corona patients | कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डाॅक्टर, कर्मचाऱ्यांचा सत्कार

कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डाॅक्टर, कर्मचाऱ्यांचा सत्कार

Next

धुळे : कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रकृती गंभीर असतानाही योग्य उपचार मिळाल्याने काेरोनावर मात करणे शक्य झाले, जिल्हा रुग्णालयाने जीवदान दिले, अशा भावना व्यक्त करत कोरोनातून सावरलेल्या संजय गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबांने डाॅक्टर, नर्स, ब्रदर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.

येथील संजय मधुकर गायकवाड (वय ४०) या तरुणाला २१ फेब्रुवारीला कोरोनाची लागण झाली होती. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी शहरातील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सिटीस्कॅन केल्यावर एचआरसीटी स्कोअर १७ आला, तर ऑक्सिजनही ७० पर्यंत खाली आला होता. चालताही येत नव्हते आणि बोलताही येत नव्हते, इतकी प्रकृती अतिशय खालावली होती. सतत २१ दिवस ऑक्सिजन लावून उपचार सुरू होते. जिल्हा रुग्णालयातील डाॅक्टर, नर्स, ब्रदर्स यांनी योग्य उपचार सुरू ठेवल्यामुळे संजयची प्रकृती हळूहळू सुधारू लागली. संजय गायकवाड पूर्णपणे बरा होऊन जिल्हा रुग्णालयाचे आभार मानत घरी परतला.

जिल्हा रुग्णालयातील डाॅक्टर आणि कर्मचाऱ्यांनी आपल्याला जीवदान दिले असून, त्यांचे उपकार आपण कधीही विसरू शकत नाही, अशा भावना त्याच्या मनात होत्या, परंतु स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्याचा निर्णय गायकवाड कुटुंबाने घेतला. जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून गायकवाड कुटुंबाने डाॅ.अश्विनी भामरे, डाॅ.महेश भडागे, परिचारिका प्रतिभा घोडके, निमोधकर, कविता सरदार, जयश्री पाटील, चंद्रमुखी पवार, गाैरी सुतार, सुमित गांगुर्डे, सचिन कुंभार, वाॅर्ड बाॅय सुनील शिरसाठ, वैभव चाैधरी, विकास साळवे, अमोल सिन्नरकर, उर्मिला सोनारे, कविता शिरसाठ यांना संविधानाची उद्देशिका भेट देऊन, तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी संजय गायकवाड, मेघा संजय गायकवाड, आबा गायकवाड, आरती आबा गायकवाड आदी उपस्थित होते.

यावेळी डाॅ.अश्विनी भामरे यांनी सांगितले की, कोरोनाची लक्षणे आढळल्यास रुग्णांनी घाबरून जाऊ नये. त्वरित जवळच्या कोविड सेंटरमध्ये जाऊन कोरोना चाचणी करून घ्यावी, तसेच डाॅक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू करावेत. संजय गायकवाड यांची ऑक्सिजन पातळी ७० तर एचआरसीटी स्कोअर १७ होता, परंतु वेळेत उपचार मिळाल्याने त्यांची प्रकृती सुधारली. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: Doctors, staff treating corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.