शिंदखेडा येथे दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:34 AM2021-04-12T04:34:14+5:302021-04-12T04:34:14+5:30

समावेशित शिक्षण योजनेंतर्गत तालुक्यातील ज्या दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य साधनेची आवश्यकता होती त्यांचे शिबिर घेण्यात आले होते. त्यातील पात्र ५७ ...

Distribution of materials to Divyang students at Shindkheda | शिंदखेडा येथे दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

शिंदखेडा येथे दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

Next

समावेशित शिक्षण योजनेंतर्गत तालुक्यातील ज्या दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य साधनेची आवश्यकता होती त्यांचे शिबिर घेण्यात आले होते. त्यातील पात्र ५७ विद्यार्थी यांचे साहित्य जिल्हा स्तरावरुन प्राप्त झाले होते. या साहित्यामध्ये व्हीलचेअर एमएस आयडी किट,सीपी चेअर,ट्रायसिकल इत्यादी प्रकारचे १२३ चलनवलन साहित्य प्राप्त होते.

त्यानुसार आज पंचायत समिती सभापती अरुण सोनवणे,उपसभापती नारायणसिंग गिरासे,माजी सभापती जिजाबराव सोनवणे,गटविकास अधिकारी एस.टी. सोनवणे,गटशिक्षणाधिकारी डॉ.सी.के.पाटील, गटसमन्वयक चुडामन बोरसे तसेच सर्व शिक्षण विस्तार अधिकारी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी, पालक उपस्थित होते. कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे व नियमांचे काटेकोर पालन करून साहित्य वैयक्तिक स्वरूपात लाभार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात येत आहे. यासाठी समावेशित शिक्षण विभागाचे विषयतज्ज्ञ ऋषिकेश वाघ, पंडित कढरे, हिरालाल चव्हाण,बाळा बोरकर,अनिल पाटील यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Distribution of materials to Divyang students at Shindkheda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.