शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

शिरपूर फॅक्टरी स्फोटात बेपत्ता कामगाराचा शोध दुस-या दिवशीही सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 22:59 IST

दोघा मंत्र्यांकडून पाहणी, चौकशीचे दिले आदेश

शिरपूर : वाघाडी-बाळदे गावांदरम्यान असलेल्या केमिकल फॅक्टरीत  अचानक झालेल्या स्फोटात १३ जण ठार झाले असून दुसºया दिवशी उशिरापर्यंत बेपत्ता कामगाराचा शोध घेण्याचे काम सुरू होते़ दरम्यान, सदर फॅक्टरीतील केमिकल्स तातडीने तेथून हलवून अन्य ठिकाणी ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी प्रशासनाला दिल्यात़ याप्रकरणी गुन्हा दाखल झाला़ घटनेच्या दुसºया दिवशी म्हणजेच रविवारी सकाळपासून पुन्हा बेपत्ता कामगारांचा शोध मोहिमेला सुरूवात झाली़ जेसीबी मशिनद्वारे कंपनीतील जळीत झालेला लोखंडी अवशेष बाजूला करण्याचे काम सुरू होते़ कंपनीच्या लिफ्टजवळ काम करीत असलेला केमिस्ट दुर्गेश विश्वास मराठे (२३) रा़वाघाडी याचा शोध घेण्याचे काम सुरू होते़ मात्र सायंकाळ उशिरापर्यंत मिळून आला नव्हता़ या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये १३ पैकी ७ जण हे कंपनीतील कामगार तर उर्वरीत ६ जण हे बाहेरील वसाहतीतील कुटुंबातील आहेत़ जखमी ७२ पैकी ४६ हे कंपनीतील कामगार तर उर्वरीत २६ हे बाहेरील आहेत़  कंपनीत स्फोट झाल्यानंतर राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (एसडीआरएफ) २ पथक दाखल झाले असून यात ७ अधिकारी व ६५ जवान आहेत़ मदत कार्य करतांना पथकातील चार जवान विजय साहेबराव दाभाडे, सोनल प्रल्हाद चौधरी, किरण आसाराम धनगर व निलेश मोराणकर असे चार जवान जखमी झाले आहेत़ सदर केमिकल्स अन्य जागी हलवून त्यांचा पंचनामा झाल्यानंतर कंपनीचे अधिकारी भिवंडी येथे  केमिकल्स नेणार असल्याचे कंपनीचे टेक्निकल डायरेक्टर डॉ़संजय वाघ यांनी सांगितले़ या स्फोटाच्या घटनेमागे काही घातपात तर नाही ना, या शक्यतेची पडताळणी करण्यासाठी एटीएसचे पथक माहिती घेत आहे़ घटनास्थळी काय चाललं आहे याची पहाणी करण्यासाठी तरूणाईसह अनेकांनी रस्त्यालगत मोठी गर्दी केली आहे़ विविध विभागाचे अधिकारी व पोलिस प्रशासन ठाण मांडून आहेत़मंत्र्यांकडून भेट आणि चौकशीचे आदेशवाघाडी, ता. शिरपूर येथील रासायनिक कंपनीत शनिवारी सकाळी झालेल्या स्फोटाची सर्वंकष, सखोल चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यानुसार चौकशी करण्यात येईल. या स्फोटातील दोषींची गय केली जाणार नाही. मदत व बचाव कार्य सुरू असून त्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे, असे राज्याचे वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. वाघाडी येथील रासायनिक कंपनीत झालेल्या स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला, तर ५० जखमी आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री श्री. महाजन, अन्न व औषध प्रशासन, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल रविवारी सकाळी धुळे जिल्हा दौºयावर आले होते. त्यांनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली. धुळ्यातही भेटमंत्री महाजन, मंत्री रावल यांनी धुळे येथील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात जावून वाघाडी येथील दुर्घटनेतील जखमींची भेट घेवून त्यांची विचारपूस केली. 

टॅग्स :DhuleधुळेShirpurशिरपूर