दिव्यांगांना या निधीचा वेळेवर लाभ मिळत नसल्यामुळे नाराजी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिव्यांगांसाठी ५ टक्के निधी हा त्या-त्या वर्षाअखेरीस खर्च करणे बंधनकारक आहे. तरीही मनपाने दिव्यांगांसाठी ५ टक्के राखीव निधी वितरित केलेला नाही. या निधीचे गरजू व दिव्यांग व्यक्तींना जीवन उंचावण्यासाठी वाटप होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी आघाडीने ही कागदपत्रे आस्थापना विभाग येथे जमा केलेली आहेत. उर्वरित लाभार्थ्यांनी तातडीने कागदपत्रांची पूर्तता करून भाजप दिव्यांग आघाडीशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
भाजप दिव्यांग विकास आघाडीचे प्रदेश सदस्य महेश काटकर, धुळे जिल्हाध्यक्ष सुनील घटी, दगडू गवळी, भटू सूर्यवंशी, दिनेश वाघ, सुरेश ठाकरे, संतोष सैंदाणे, संतोष जाधव, यशवंत पाटील, संजय पाटील, कृष्णा गवळी, गीता कटारिया, विनोद पवार आदी उपस्थित होते.