लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : लॉकडाऊनमुळे तब्बल अडीच महिने ठप्प पडलेला ट्रान्सपोर्ट व्यवसाय अनलॉकच्या पहिल्या टप्यात थोड्याफार प्रमाणात सुरू झाला.मात्र एस.टी.महामंडळाने सुरू केलेली मालवाहतुक त्याचबरोबर गेल्या काही दिवसात डिझेलच्या दरात एकदम झालेली वाढ यामुळे या व्यवसायालाचा चांगलाच फटका बसू लागला आहे.धुळे हे दोन राज्यांच्या सीमेवर तसेच तीन महामार्गावरील शहर आहे. या ठिकाणाहून राज्याच्या कानाकोपऱ्यासह मध्यप्रदेश, गुजरात या राज्यात सहज जाता येते. त्यामुळे येथे ट्रान्सपोर्ट व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. धुळे जिल्ह्यात मालवाहतुकीच्या जवळपास पाच ते साडेपाच हजार लहान मोठ्या गाड्या आहेत. प्रतिटनानुसार मालवाहतुकीचे भाडे आकारण्यात येत असते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे इतर व्यवसायांप्रमाणेच ट्रान्सपोर्ट व्यवसायही ठप्प झाला होता. लॉकडाऊनच्या कालावधीत केवळ भाजीपाला, औषधी, व इतर अत्यावश्यक माल वाहतुकीसाठीच वाहने सुरू होती. उर्वरित वाहने ही जागेवरच थांबून होती. गेल्या अडीच महिन्यात जिल्ह्यातील ट्रान्सपोर्ट व्यवसायाला तब्बल ७० ते ८० कोटी रूपयांचा फटका बसलेला आहे.दरम्यान राज्य शासनाने ३ जून पासून अनलॉकचा पहिला टप्पा जाहीर केला. यात काही व्यवसायांना मुभा दिलेली आहे.अनलॉकच्या पहिल्या टप्यात ट्रान्सपोर्ट व्यवसाय काही प्रमाणात सुरू झालेला आहे. मात्र गाड्यांची चाके हलली तरी व्यावसायिकांना मात्र अडचणीचा सामना करावा लागतोय.वाहतूक काही प्रमाणात सुरू झालेली असली तरी अनेक ठिकाणी माल उपलब्ध होऊ शकत नाही. त्यातच गेल्या काही दिवसात डिझेलचे दर अचानक मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्याचा फटकाही या व्यवसायाला बसलाआहे. दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी आहे.
डिझेल दरवाढीचा ट्रान्सपोर्ट व्यवसायाला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 20:56 IST