सोनगीर : धुळ्याहून दुचाकीने अमळनेरला जाणा:या एसआरपी जवानाला डांगरजवळ (ता. अमळनेर) समोरून येणा:या काळी-पिवळी व्हॅनने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली़ विनोद सुरेश ठाकूर (वय 40, रा़ मूळ सोनगीर व ह़मु अमळनेर) असे जवानाचे नाव आह़े तो धुळ्यात एसआरपी बल गट क्रमांक सहा येथे कार्यरत होता. शुक्रवारी दुपारी डय़ुटी संपल्यानंतर घरी अमळनेरला जात असताना त्यांच्या दुचाकीला व्हॅनने (क्ऱ एमएच-19, वाय 1056) जोरदार धडक दिली़घटनेची माहिती मिळताच सोनगीर येथील जवानाच्या मित्र परिवार यांची अमळनेरच्या शासकीय रुग्णालयात गर्दी झाली होती़ याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. मयत ठाकूर यांच्यावर येथील अमरधाममध्ये उद्या आज शनिवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
धुळ्याचा एसआरपी जवान अपघातात ठार
By admin | Updated: February 3, 2017 23:57 IST