धुळे - राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत धुळ्याच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. इंदापूर येथे झालेल्या राज्य निवड चाचणी स्पर्धेत राष्ट्रीय तालीम संघाचे खेळाडू जगदीश मोहन रोकडे व कीर्ती हिरस्वामी गुडलेकर या खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावले आहे.
१६ ते १९ सप्टेंबर या कालावधीत उत्तर प्रदेशातील अमेठी येथे राष्ट्रीय फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धा पार पडणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र राज्य संघाची निवड चाचणी सपर्धा नुकतीच इंदापूर जिल्हा पुणे याठिकाणी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत कीर्ती गुडलेकर हिने ५० तर जगदीश रोकडे याने ५५ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. अमेठी येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत ते महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यांच्या यशाबद्द्दल धुळे राष्ट्रीय तालीम संघाचे जिल्हाध्यक्ष माजी आ. राजवर्धन कदमबांडे, राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, संजय अग्रवाल, दिलीप लोहार, चंद्रकांत सैंदाणे, सुनील महाले, रावसाहेब गिरासे, गोकुळ परदेशी, शामकांत ईशी , सुनील चौधरी, उमेश चौधरी, भगवान कलेवर, महेश बोरसे, संदीप पाटोळे, सचिन कराड, गणेश फुलपगारे, मदन केशे, धुळे तालुका तालीम संघाचे अध्यक्ष कल्याण गरुड, संजय वाडेकर, सचिन जाधव यांनी अभिनंदन केले आहे.