शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor Live Updates: PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'ऑपरेशन सिंदूर'ची दिली माहिती
2
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
3
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
4
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
5
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
6
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
7
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
8
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
9
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक, कोण काय म्हणाले?
10
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
11
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
12
चंद्र-केतु ग्रहण योगात मोहिनी एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी नारायणाची कृपा, शुभ फले; घवघवीत यश!
13
BSNL नं आणली Mother's Day ऑफर, स्वस्त केले आपले ३ रिचार्ज प्लान्स; पाहा डिटेल्स
14
Operation Sindoor : "जे काही घडलं ते बरोबर, पहलगाममध्ये धर्म विचारणाऱ्या ४ दहशतवाद्यांचाही केला पाहिजे खात्मा"
15
विजापूरमध्ये भीषण चकमक; कर्रेगुट्टा टेकड्यांमध्ये लपलेल्या 15+ नक्षलवाद्यांचा खात्मा
16
त्यांनी महिलांना मारलं नाही पण...; पहलगाम हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी 'ऑपरेशन सिंदूर'वर काय म्हणाले?
17
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
18
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंग, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
19
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
20
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक

धुळेकरांची पाण्यासाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 21:28 IST

पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले : दिवसा उन्हाचे चटके अन पोलिसांच्या भितीने रात्री करावी लागते भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : लॉकडाउनमध्ये सुध्दा धुळेकरांची पाण्यासाठी भटकंती सुरु आहे़ कोरोनाच्या वाढत्या संसर्गामध्ये अनियमीत पाणीपुरवठा होत असल्याने नागरीकांची चिंता वाढली आहे़ पिण्यासाठी पाणी नाही तर वैयक्तिक स्वच्छता राखायची कशी, असा प्रश्न नागरिक उपस्थित करु लागले आहेत़धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नकाणे, डेडरगाव, तापी आणि इतर जलस्त्रोतांमध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा असताना; केवळ महानगरपालिकेचे नियोजन नसल्याने धुळेकरांना मे हीटच्या तडाख्यात पाण्याचे देखील चटके सोसावे लागत आहेत़ नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत असले तरी कोरोना संसर्ग आणि लॉकडाउन, संचारबंदी, पोलिसांचा दंडुका अशा दुहेरी भितीमुळे नागरिक तक्रारी करण्यासाठी धजावत नाहीत़ पाणीपुरवठ्याच्या बाबतीत नगरसेवक देखील पाठपुरावा करत नसल्याची ओरड वाढली आहे़दरम्यान, धुळे शहरात पाचव्या दिवशी पाणीपुरवठा होतो़ परंतु वीजपुरवठा खंडीत असेल किंवा पाईपलाईनला गळती असेल तर तेवढ्या भागापुरता पाणीपुरवठा एक दोन दिवस उशिराने होतो, अशी माहिती महानगरपालिकेचे शहर अभियंता कैलास शिंदे यांनी लोकमतला दिली़महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने वीज वितरण कंपनीशी समन्वय साधून नियोजन केले तर गैरसोय टळू शकते असे जाणकारांचे मत आहे़महानगरपालिकेच्या कागदोपत्री नियोजनानुसार धुळे शहरात आणि कॉलनी परिसरात चार दिवसाआड म्हणजे पाचव्या दिवशी पाणीपुरवठा होता़ प्रत्यक्षात मात्र कधी कधी पाचव्या दिवशी तर कधीकधी आठव्या दिवशी पाणीपुरवठा होत असल्याचे विदारक चित्र आहे़ साक्री रोडवरील मोगलाई आणि इतर परिसरांमध्ये रविवारी आणि सोमवारी आठव्या दिवशी पाणीपुरवठा झाला़ पुरेसे पाणी मिळाले नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत़ गोळीबार टेकडी रोड परिसरात कृषी नगर आणि लगतच्या कॉलन्यांमध्ये देखील आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा होतो़ त्यामुळे पाणी साठवण्यासाठी नागरिकांची कसरत होते़देवपूर आणि नगावबारी परिसरात देखील आठव्या दिवशी पाणीपुरवठा होत असल्याची माहिती मिळाली आहे़ या भागात सलग बारा तास पाणीपुरवठा होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत असल्याच्या तक्रारी देखील सुज्ञ नागरिकांनी केल्या आहेत़ वलवाडी परिसरातील चावरा शाळेजवळच्या कॉलनी परिसरामध्ये सोमवारी सहाव्या दिवशी पाणीपुरवठा झाला़ पाण्याचा दाब कमी असल्याने अनेकांना पुरेसे पाणी मिळाले नसल्याने संताप व्यक्त होत आहे़वलवाडीच्या वडेल रोड भागात मोठ्या प्रमाणावर नविन वसाहती स्थापन झाल्या आहेत़ या परिसरात पोलीस, एसआरपी, शिक्षक आणि शासकीय कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे़ बहुते सर्वांनी पाण्यासाठी विहिरी आणि बोअरवेल केल्या आहेत़ परंतु उन्हाळ्यात पाण्याची पातळी खालावते़ शिवाय आठ ते दहा दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने पिण्याचे पाणी मिळत नाही़ त्यामुळे खाजगी व्यावसायिकांकडून घरपोच येणाºया पाण्याच्या जारवर या रहिवाशांना अवलंबून राहावे लागते़ पाण्यासाठी नाहक आर्थिक भूर्दंड सोसावा लागतो़दरम्यान, वडेल रोड भागातील प्रेरणा सोसायटी वगैरे परिसरात जुनी पाईपलाईन आहे़ नविन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे़ काम पूर्ण झाल्यावर या भागातील पाणीपुरवठा देखील सुरळीत होईल, अशी माहिती शहर अभियंता कैलास शिंदे यांनी दिली़अनियमीत पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना रात्रीच्या वेळी पाण्यासाठी भटकंती करावी लागते़ साक्र्री रोड परिसरात नेहरु पुतळा, पांझरा वॉटर, हनुमान टेकडी जलकुंभ, देवपूर पश्चिम पोलीस स्टेशनसमोरील नळावर रात्र पाणी भरणाºयांची गर्दी असते़ तशीच गर्दी वाडीभोकर रोडवरील रामनगर जलकुभ, नवरंग पाण्याची टाकी, फाशी पुल चौकातील अशोक नगर जलकुंभ याठिकाणी देखील असते़काही भागात पुर्ण दाबाने पाणी येते तर काही भागात पाण्याचा दाब कमी असतो़ अशा परिस्थितीत पाच दिवस पुरेल इतका पाणीसाठा करण्याचा प्रयत्न नागरीक करतात़ परंतु सर्वांच्याच घरात पाणी साठविण्याची साधने असतात असे नाही़ शिवाय प्रत्येकाच्या घरी विहीर किंवा बोअरवेल आहे असेही नाही़ त्यामुळे तीन दिवसानंतर पाणी संपायला येते़ महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये आणि कॉलनी परिसरामध्ये तर अतीशय वाईट परिस्थिती आहे़ याठिकाणचा पाणीपुरवठा अजुनही नियमीत आणि वेळेवर नाही़ वेळापत्रकानुसार पाणी येत नाही़ त्यामुळे रहिवाशांचे नियोजन कोलमडते़बºयाचदा पिण्यासाठी पाणी नसते तर वैयक्तिक स्वच्छतेचा प्रश्नच उद्भवत नाही़ काटकसरीने पाणी वापरण्याच्या प्रयत्नात बºयाचदा स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे़ जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी बाहेर पडणाºया नागरीकांना घरी आल्यावर स्वच्छतेसाठी पाणी नसते़ अत्यावश्यक सेवेतील चाकरमान्यांची देखील गैरसोय होत आहे़ मनपाच्या सफाई कर्मचाºयांची परिस्थिती साधारण आहे़ त्यांच्या घरात पाणी साठवण्यासाठी मोठी साधने नाहीत़ त्यामुळे पाण्याअभावी त्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे़कोरोनाच्या वाढत्या संसर्गात विस्कळीत झालेला पाणीपुरवठा धुळे शहरासाठी धोक्याची घंटा ठरु शकतो़ महानगरपालिकेने त्वरीत पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे, अशी मागणी होत आहे़उन्हाळ्यात पाण्याचा वापर वाढला आहे़ कुलर सुरु झाल्याने नेहमीपेक्षा अधिक पाणी लागते़ त्यामुळे साठवलेल्या पाण्याचे नियोजन बिघडल्यामुळे देखील घरातील पाण्याचा साठा संपतो आहे़ पाणी संपल्यावर इतर ठिकाणी जावून पाणी आणावे लागत आहे़ नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे़वलवाडी कॉलनी परिसरात दुजाभाववलवाडी ग्रामपंचायतीचा महानगरपालिकेत समावेश होवून दोन वर्षे झाली तरी परिस्थिती बदलली नाही़ वलवाडी परिसरात शेकडो कॉलन्या आहेत़ निम्मे कॉलन्यांना नकाणे तलावातून तर देवपूरातील उर्वरीत कॉलन्यांना तापी योजनेच्या जलकुंभावरुन पाणीपुरवठा होता़ या कॉलन्यांना नियमीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी महापालिकेने स्वतंत्र व्यवस्था केली आहे़ परंतु नियोजनाअभावी कॉलनी परिसरात वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आहेत़ चार दिवसाआड म्हणजे पाचव्या दिवशी होणारा पाणीपुरवठा पुर्ण दाबाने होत नाही; शिवाय नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही़ वडेल रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर नविन वसाहती वसल्या आहेत़ येथील पाणीपुरवठ्याची परिस्थिती अतीशय बिकट आहे़ आठ दिवसानंतर कमी दाबाने पाणी येत असल्याने येथील नागरिकांना नेहमीच पाण्यासाठी भटकंती करावी लागते़ चावरा शाळेच्या परिसरातील कॉलन्यांची पाण्याची समस्या आजही जैसे थे आहे़ तसेच ग्रामपंचायत अस्तित्वात असताना वलवाडी गावाला दोन दिवसाआड तर कॉलनी परिसराला चार दिवसाआड पाणीपुरवठ्याचा दुजाभाव आज महानगरपालिका असतानाही कायम आहे़ कॉलनी परिसरातील नागरिकांना रामनगर जलकुंभ किंवा वलवाडी पाणीपुरवठा योजनेच्या जलकुंभांवर जावून पाणी आणावे लागते़ त्यामुळे अनेकांची नेहमीच गैरसोय होते़ पालिकेने उपाययोजना कराव्या़

टॅग्स :Dhuleधुळे