शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
4
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
5
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
6
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
7
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
8
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
9
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
10
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
11
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
12
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
13
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
14
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
15
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
16
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
17
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
18
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
19
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
20
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट

धुळेकरांनी लॉकडाउनचा उडाविला ‘फज्जा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 21:52 IST

मुदत वाढविल्यानंतरचे चित्र : रस्त्यावर नेहमीपेक्षाही जास्त गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

धुळे : शहरात वाढत जाणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाहता जिल्हाधिकारी संजय यादव यांनी १७ तारखेपर्यंत लॉकडाउन वाढविला. ऐरवी नेहमीसुद्ध एवढी गर्दी कधी होत नाही. तेवढी गर्दी धुळेकरांनी लॉकडाउनची मुदत वाढविल्यानंतर पहिल्याच दिवशी रस्त्यावर येऊन केली. धुळेकरांनी सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा करीत लॉकडाउन आणि कोरोनाचे गांभीर्यच नसल्याचे दाखवून दिले. देवपूर आणि धुळे शहराला जोडलेल्या कालिकादेवी मंदिराजवळील लहान पुलावर शुक्रवारी सकाळी अक्षरश: ट्रॅफीक जाम झाले होते. शहरात लॉकडाउन आहे की नाही, असा प्रश्न त्यामुळे साहजिकच सर्वांना पडला.शहरात आग्रारोड, महात्मा गांधी चौक परिसरातही सकाळी तीच परिस्थिती होती.शुक्रवारी तर कन्टेन्मेट झोन जाहीर असलेल्या भागातही नागरिक सहजपणे प्रवेश करुन ये - जा करतांना दिसून आले.सोशल डिस्टन्सिंग - शहरात सोशल डिस्टन्सिंग आणि तोंडाला मास्क लावण्याबाबत तर न बोललेच बरे असे सांगावेसे वाटते. कारण अगदी नेहमीप्रमाणे गर्दी करीत भाजीपाला खरेदी आणि अन्य व्यवहार केले जात होते. शहरातील अनेक भागात सर्वच दुकाने छुप्या पद्धतीने सुरुच आहे. त्यामुळे लॉकडाउन हे फक्त नावालच आहे, असे स्पष्ट दिसते.पुलावर प्रचंड गर्दी - देवपूर आणि धुळे शहराला जोडणाºया पांझरा नदीच्या पुलावर तर दोन्ही बाजुने येणाºया दुचाकी आणि चारचाकी वाहनांमुळे चक्क ट्रॅफीक जाम झाली होती. परिसरात गाडयांच्या कर्णकर्कश आवाज होत होता. याठिकाणी उभ्या अनेक लोकांनी तर याचे व्हिडीओ काढले तर काहींनी त्याचे फोटो काढण्यातच मग्न दिसले. कोणालाही लॉकडाउन अथवा कोरोनाच्या प्रादुर्भावाचे गांभीर्य दिसले नाही.याठिकाणी पोलीस बंदोबस्ताला होते. परंतू ते कोणाकोणाला अडवतील. कारण सर्वच चारचाकी आणि दुचाकीवाले कोण - कोणाचा ओळखीचा असेल, अडविले तर फोन येईल आणि विनाकारण आपल्या माघार घेत सोडावे लागेल. त्यापेक्षा जो येतो आणि जो जातो आहे. त्या सर्वांचा मार्ग मोकळा करण्यातच तो गुंतलेला दिसला.शासनातर्फे कोरोनाचे रुग्ण शहरात वाढत असल्यामुळे त्याचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आवश्यक त्या उपाय योजना आणि लॉकडाउन जाहीर केला आहे.परंतू याकडे धुळेकर अजुनही गांभीर्याने लक्ष देतांना दिसून येत नाही. नागरिक रस्त्यावर दिसत आहे. कोणीही थांबण्यास तयार नाही. प्रत्येकाला शहरात काही न काही काम असल्यासारखे फिरतांना दिसत आहे.यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुन्हा कडक उपाययोजना करण्याची गरज आहे. कारण अशापद्धतीने जर गर्दी होत गेली तर त्यातून संसर्ग वाढण्याची भीती जास्त आहे. धुळेकरांना आतातरी याचे गांभीर्य ओळखावे, अशी अपेक्षा आहे.शहरातील बंद रस्ते स्वत:च सुरु केलेशहरात एकूण २४ कन्टेन्मेट झोन तयार करण्यात आले आहेत. त्या परिसरातील सर्वच रस्ते मनपा प्रशासनाने बंद केले आहेत. त्यासाठी मनपा प्रशासनाने रस्त्यावर लाकडी बांबू आणि अन्य साहित्याने ते बंद केले आहे. परंतु सुरुवातीचे काही दिवस वगळता नागरिकांनी आपल्या सोयीनुसार रस्त्यावरील अडथळे दूर करुन रस्ते सुरु केले आहे. त्यावरुन आता सर्रासपणे वाहतूक सुरु झाली आहे. प्रतिबंधित क्षेत्रात बाहेरच्या व्यक्तीला येणे आणि आतील व्यक्ती बाहेर जाणेही शक्य नाही, असा नियम असतांना त्याकडे दुर्लक्ष करुन ही वाहतूक सुरु झाली आहे. मनपा प्रशासन आणि पोलिसांनी याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. ते रस्ते पुन्हा बंद केले पाहिजे. तसेच ते करणाºयाविरोधात आवश्यक ती कारवाई करणे गरजेचे आहे.कॉलनी परिसरात रस्ते बंद करुन क्रिकेटशहरातील काही कॉलनी परिसरात आणि पेठ भागातील गल्लीमध्ये आपल्या सोयीनुसार मनपा प्रशासनाने सांगितले नसले तरी रस्ते अडथळे निर्माण करुन ते बंद केले आहे. ते सुद्धा आपल्या सोयीसाठी कारण रस्ते बंद करुन त्यावर सर्रासपणे क्रिेकेट खेळतांना किंवा घोळका करुन ओटयावर बसून गप्पा मारतांना तरुण दिसतात. रस्ता बंद हा घरात थांबण्यासाठी आणि कोणी बाहेरचा व्यक्ती येऊ नये यासाठी असतांना त्या नियमाच्या अगदी विरुद्ध कृती नागरिक करीत आहे. रात्री उशीरापर्यंत आणि दुपारी तरुण मंडळी क्रिेकेट खेळतांना दिसत आहे. याकडेही जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन ते बंद केले पाहिजे. पण त्याकडे कोणीही लक्ष देत नसल्याचे सतत सुरु असलेल्या या गोष्टीमुळे स्पष्ट जाणवते. आतातरी ते बंद व्हावे अशी अपेक्षा आहे.विनाकारण बंद रस्त्यामुळे होतोय् त्रासएकीकडे मनपा प्रशासनाने बंद केलेले रस्ते आपल्या सोयीसाठी खुले केले जात आहे. तर दुसरीकडे खुले रस्ते नागरिक विनाकारण बंद करीत आहेत. या दोन्ही गोष्टी प्रशासनाने बंद केल्या पाहिजे. कारण विनाकारण बंद केलेल्या रस्त्यामुळे जे नेहमी खरोखर कामासाठी बाहेर जातात. त्या सर्व लोकाना याचा त्रास होतो. लोकांनी रस्ता बंद केल्यामुळे त्यांना एक ते दोन किलोमीटरचा फेरा करीत दररोज जावे लागते. तसे होऊ नये म्हणून मनपा प्रशासनाने असे विनाकारण बंद रस्ते खुले केले पाहिजे. तसेच याउलट कन्टेन्मेट झोनमधील जे रस्ते नागरिकांनी आपल्या सोयीसाठी न विचारता सुरु केले आहेत. ते पुन्हा बंद करण्यात यावे. अन्यथा कन्टेन्मेट झोनमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरण्याची जास्त भिती आहे. मनपा प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Dhuleधुळे