आॅनलाइन लोकमतधुळे :कोरोनाचा जिल्हा परिषदेतही शिरकाव झालेला आहे. बांधकाम विभागातील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने, ६ व ७ आॅगस्ट २०२० असे दोन दिवस कर्मचारी घरूनच काम करणार आहेत. त्यामुळे दोन दिवस जिल्हा परिषद पूर्णपणे बंद राहणार असल्याचे कळविण्यात आले आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सुरवातीच्या दिवसात जिल्हा परिषदेचे सर्व दरवाजे बंद करून, फक्त कर्मचाऱ्यांनाच प्रवेश दिला जात होता. मात्र अनलॉकच्या पहिल्या टप्यापासून जिल्हा परिषदेत पूर्वीसारखीच वर्दळ वाढलेली आहे.आतापर्यंत धुळे मनपा व शिरपूर पंचायत समितीमधील कर्मचाºयांना कोरोनाची लागण झालेली असतांना मात्र जिल्हा परिषद सुरक्षित मानली जात होती. परंतु जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील वरिष्ठ सहाय्यकास कोरोनाची लागण झालेली असल्याने खळबळ उडालेली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व संपर्क साखळी तोडण्यासाठी ६ व ७ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषद बंद राहून सर्व विभागातील कर्मचारी (अत्यावश्यक सेवा वगळून) घरूनच काम करणार आहेत.तर ८ व ९ रोजी सुटी आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेचे कामकाज १० आॅगस्टपासून नियमित सुरू होईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांनी काढलेल्या पत्रकात नमूद केले आहे.दरम्यान जिल्हा परिषदेतील कर्मचारी बाधित आढळून आल्याने जिल्हा परिषदेचा सर्व परिसरात सॅनिटायझर करण्यात येत आहे.दरम्यान या संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून इतरांना येण्या-जाण्यास प्रतिबंध घालावा अशी मागणीही होऊ लागली आहे.
धुळे जिल्हा परिषदेचा कर्मचारी बाधित आढळला, दोन दिवस कार्यालय बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 11:57 IST