शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

धुळे जिल्हा परिषदेत फक्त तीन सदस्यांची झाली ‘रिएन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 12:02 IST

२०१३ च्या निवडणुकीत हे तीनही सदस्य आले होते निवडून,

आॅनलाइन लोकमतधुळे : मतमोजणी झाल्यानंतर जिल्ह्यातील गटांचे प्रतिनिधीत्व कोण करणार हे स्पष्ट झालेले आहे. २०१३ मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत निवडून येत गटाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्यांपैकी यावेळी फक्त तिघांचीच ‘रिएन्ट्री’ (दुसऱ्यांदा निवड) झालेली आहे. तर उर्वरित ५३ जणांमध्ये अनेक नवीन चेहरे आहे. ते प्रथमच आपल्या गटांचे प्रतिनिधीत्व करणार आहे. तर काही सदस्य ‘ब्रेक’नंतर पुन्हा जिल्हा परिषदेत विजयी होऊन आले आहेत.बुधवारी जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील त्या-त्या गटांचे प्रतिनिधीत्व कोण करणार हे स्पष्ट झाले आहे.गेल्यावेळी जिल्हा परिषदत गटांचे प्रतिनिधीत्व करणाºया ५६ पैकी फक्त तिघांनाच सलग दुसºयांदा जिल्हा परिषदेत गटाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे.यात सुधीर सुधाकर जाधव यांचा समावेश आहे. २०१३ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेतर्फे बाळापूर गटातून निवडूक लढवून गटाचे प्रतिनिधीत्व केले होते. मात्र यावेळी बाळापूर गाव महापालिकेच्या हद्दित समाविष्ट झाल्याने, हा गटच बाद झाला. त्यामुळे सुधीर जाधव यांनी निमडाळे गटातून भाजपतर्फे निवडणूक लढवून विजयी झाले.तसेच साक्री तालुक्यातील मंगला सुरेश पाटील या देखील सलग दुसºयावेळी आपल्या गटाचे प्रतिनिधीत्व करतील. गेल्यावेळी त्यांनी मालपूर गटातून भाजपतर्फे उमेदवारी केली होती. यावेळी गटांच्या फेररचनेत हा गट बाद झाल्याने त्यांनी बळसाणे गटातून उमेदवारी करीत विजय मिळविला आहे.तर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष देवेंद्र जयराम पाटील हे देखील पुन्हा निवडणून आलेले आहेत. पाटील हे २०१३ मध्ये शिरपूर तालुक्यातील वाघाडी गटातून कॉँग्रेसतर्फे उमेदवारी करीत जिल्हा परिषदेत पोहचले होते. मात्र यावेळी त्यांनी भाजपत प्रवेश करून शिंगावे गटातून निवडणूक लढवित विजय मिळविला आहे. ते आता शिंगावे गटाचे प्रतिनिधीत्व करणार आहे.जिल्हा परिषद निवडणुकीत अनेक नवीन चेहºयांना संधी मिळाली आहे. तर काही जणांनी यापूर्वी गटाचे प्रतिनिधीत्व केले होते. ‘ब्रेक’नंतर त्यांनी यावेळी निवडणूक लढवित पुन्हा जि.प.त प्रवेश केला आहे. त्यांच्या अनुभावाचाही लाभ सदस्यांना होणार आहे.

टॅग्स :Dhuleधुळे