धुळे : केनिया येथील एका कंपनीत अभियंता पदावर कार्यरत असलेला धुळ्याच्या तरुणाचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे़ त्याचा मृतदेह धुळ्यात आणला जाणार असून त्याच्यावर दुपारुन अंत्यसंंस्कार करण्यात येतील़धुळे येथील सेवानिवृत्त कृषी सहाय्यक माधवराव चौधरी यांचा मोठा मुलगा निलेश चौधरी हा गेल्या ४ ते ५ वर्षापासून मशीन इंजिनिअर या पदावर केनिया येथे नोकरीला होता़ रस्ता ओलांडत असताना भरधाव येणाऱ्या ट्रकने त्यास जोरदार धडक दिल्याने त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला़ अपघाताची ही घटना शुक्रवार ६ मार्च रोजी संध्याकाळी घडली़ त्याला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ त्याच्यावर उपचार सुरु असताना सोमवार ९ मार्च रोजी केनिया येथील रुग्णालयात त्याला मयत घोषित करण्यात आले़निलेश याचा मृतदेह धुळ्यात आणला जाणार असून दुपारी देवपुरातील स्वामी नगर, प्लॉट नंबर ३०, उन्नती शाळेजवळ, शारदा नेत्रालय नकाणे रोड येथील राहत्या घरापासून निघणार आहे़ त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी व तीन वर्षाची लहान मुलगी परी असा परिवार आहे़
केनियातील अपघातात धुळ्याचा तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:04 IST