आॅनलाइन लोकमतधुळे : कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांना महाराष्टÑ पुरोगामी शिक्षक संघटनेतर्फे जीवनावश्यक वस्तुंची मदत करण्यात आली.यात एका कीटमध्ये पाच किलो तांदूळ, एक किलो तुरदाळ, पाच किलो गव्हाचे पीठ, १ किलो गोडेतेल, पावकिलो तिखट, १ किलो साखर, २५० ग्रॅम चहापूड, दंतमंजन, खोबरेल तेल, मीठ आदी गृपपयोगी वस्तुंची मदत केली. असे एकूण १०१ कीट तयार करून प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मनीष पवार यांच्या प्रमुख उपस्थितीतून जिल्हा परिषद आवारातून कोल्हापूरकडे रवाना करण्यात आले. शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनीही दोन कीट मदत केली.यासाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमराव बोरसे, सरचिटणीस भूपेश वाघ, कार्याध्यक्ष प्रशांत महाले, महिला अध्यक्षा दीपा मोरे, विभागीय अध्यक्ष प्रभाकर चौधरी, महिला सरचिटणीस प्रतिभा वाघ, कार्याध्यक्ष सुरेखा बोरसे, रवींद्र देवरे, दिलीप वाडेकर, ऋषिकेश कापडे, खुशाल चित्ते, गोपाल चौधरी, विनय नेरकर, गणेश पाटील, मधुकर देवरे, वैशाली बच्छाव, संगीता ठाकरे, संजय शेवाळे, कमलेश चव्हाण, कैलास सोनवणे, आर.टी.वाघ, मीरा परोडवाड, रंजना राठोड, मंगेश राजपूत यांनी परिश्रम घेतले. दरम्यान शिक्षक संघटनेच्या या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केलेले आहे.
धुळ्यातील शिक्षक संघटनेकडून पूरग्रस्तांना केली मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 11:30 IST